TRENDING:

मोबाईल पाण्यात फेकला, 13 वर्षीय मुलाने थेट गेमच केला, महिलेचा मृत्यू!

Last Updated:

Jalna Crime: मोबाईल फोन पाण्यात फेकण्याच्या वादातून 13 वर्षीय मुलाने थेट महिलेचा खून केला आहे. जालन्यातील या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: मोबाईल पाण्यात फेकला आणि शेतात जाणारे पाणी अडवल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने 41 वर्षीय महिलेचा खूनच केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी येथील घटनेने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे असे होते. या प्रकरणी अंकुश सदाशिव औटे यांनी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. एलसीबी पथक आणि तीर्थपुरी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
Jalna Crime: मोबाईल पाण्यात फेकला, 13 वर्षीय मुलाचे थेट गेमच केला, महिलेचा मृत्यू!
Jalna Crime: मोबाईल पाण्यात फेकला, 13 वर्षीय मुलाचे थेट गेमच केला, महिलेचा मृत्यू!
advertisement

नेमकं घडलं काय?

25 मार्च रोजी शेतात पाटाचे पाणी आणि मोबाईल पाण्यात फेकल्यावरून 13 वर्षीय मुलाचा महिलेशी वाद झाला होता. या रागातून मुलाने 41 वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारले. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खुनाचा छडा लावला. पोलीस तपासानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

advertisement

मावस भाऊ-बहिणीनं गुपचूप उरकलं लग्न, बदनामीची भीती अन् पुढं भलतंच कांड!

View More

असा झाला उलगडा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

या घटनेनंतर गावातील काही लोकांनी एका मुलाला शेतातून पळताना पाहिले होते. त्यांनी पोलिसांना या मुलाचे वर्णन दिले, ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत झाली. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि तीर्थपुरी पोलिसांनी एकूण 7 संशयितांची चौकशी केली. अखेरीस शेजारील शेतातून पळणाऱ्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली. या तपासात पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी विशाल खांबे यांच्यासह एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे साजिद अहमद आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
मोबाईल पाण्यात फेकला, 13 वर्षीय मुलाने थेट गेमच केला, महिलेचा मृत्यू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल