advertisement

मावस भाऊ-बहिणीनं गुपचूप उरकलं लग्न, बदनामीची भीती अन् पुढं भलतंच कांड!

Last Updated:

Love Marriage: नवी मुंबईत एका तरुणानं जानेवारीमध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरात पोलिस चौकशीत भलताच प्रकार पुढे आला आहे.

मावस भाऊ-बहिणीनं गुपचूप उरकलं लग्न, बदनामीची भीती अन् पुढं भलतंच कांड!
मावस भाऊ-बहिणीनं गुपचूप उरकलं लग्न, बदनामीची भीती अन् पुढं भलतंच कांड!
नवी मुंबई: प्रेम हे आंधळं असतं असं बऱ्याचदा म्हटलं जातं. प्रत्येक नात्यात एक वेगळ्या स्वरुपाचं प्रेमाचं नातं असतं. भाऊ-बहिण अशाच एका पवित्र प्रेमाच्या बंधनात असतात. परंतु, नवी मुंबईत याच नात्याला काळीमा फासल्याचा प्रकार पुढे आलाये. जानेवारीमध्ये उलवे परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस तपासातून धकक्कादायक माहिती पुढे आलीये.
तरुणाची आत्महत्या
नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने अचानक आत्महत्या केली होती. जानेवारीत हा प्रकार घडला. मात्र, आत्महत्येचं नेमकं कारण पुढं आलं नव्हतं. सदर घटनेची चौकशी पोलीस करत होते. मात्र, कारण स्पष्ट होत नव्हते. अखेर पोलिसांना तपासात यश आले आणि चौकशीतून प्रेमसंबंधातून आत्महत्या झाल्याचे समोर आले.
advertisement
मावस भाऊ-बहिणीचे प्रेमसंबंध
मावस भाऊ आणि बहिणीचा एकमेकांवर जीव जडला होता. काही दिवस प्रेमसंबंधात राहिल्यानंतर दोघांनी रजिस्टर लग्नाचा निर्णय घेतला. या घटनेची कुटुंबीयांना कोणतीही माहिती नव्हती. काही दिवसांनी तरुणीला बदनामीची भीती वाटू लागली. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि दोघांत बेबनाव होत होता.
तरुणीने केले दुसरे लग्न
बदनामीच्या भीतीतून दोघांत वाद होत होते. अशातच तरुणीने दुसऱ्या एका तरुणासोबत रजिस्टर लग्न केले. ही बाब संबंधित तरुणाला समजली. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. या तणावतच त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांनी मित्र परिवाराकडे चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
advertisement
तरुणीवर गुन्हा
तरुणाने प्रेमसंबंधांतून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संबंधित तरुणीवर उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मावस भाऊ-बहिणीनं गुपचूप उरकलं लग्न, बदनामीची भीती अन् पुढं भलतंच कांड!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement