TRENDING:

Jalna Rape case: सरपण आणायला गेलेल्या मतिमंद महिलेला शेतात गाठलं, सामूहिक अत्याचाराने जालना हादरलं!

Last Updated:

Jalna Rape Case: जळणासाठी लाकडं आणायला गेलेल्या मतिमंद महिलेवर सामूहिक अत्याचार झाला. जालन्यातील या प्रकारानंतर संताप व्यक्त होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: गेल्या काही काळात महिला अत्याचारांच्या घटनांवरून महाराष्ट्र हादरला आहे. अशातच जालन्यातून एक दुर्दैवी प्रकार पुढे आलाय. जळणासाठी लाकडे आणायला शेतात गेलेल्या मतिमंद विवाहितेवर 3 नराधमांनी सामूहिक अत्याचार केले. भोकरदन तालुक्यातील हा प्रकार एका व्हिडिओ चित्रकणाने उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या पतीने तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आलीये.
Jalna Rape case: मतिमंद विवाहितेवर सामूहिक अत्याचार, जळणासाठी लाकडं आणायला गेली, Video मुळे फुटली वाचा!
Jalna Rape case: मतिमंद विवाहितेवर सामूहिक अत्याचार, जळणासाठी लाकडं आणायला गेली, Video मुळे फुटली वाचा!
advertisement

सद्दाम खान अजमेरखान पठाण, सादिकखान शरीफखान पठाण, फारुखखान जिलानीखान पठाण अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून आरोपींवर कारवाईची मागणी होतेय.

Jalna Fraud: गाडीचे हप्ते थकले, पठ्ठ्यानं भलतंच डोकं लावलं, फायनान्स कंपनीला फसवलं, पण पोलिसांनी..

नेमकं घडलं काय?

advertisement

View More

भोकरदन तालुक्यात एक मतिमंद विवाहिता जळणासाठी लाकूड-फाटा आणण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी संशयित सद्दामखान अजमेरखान आरोपी पठाण, सादिकखान शरीफखान पठाण,फारुखखान जिलानीखान पठाण यांनी सामूहिकरीत्या तिच्यावर अत्याचार केला. विवाहितेसोबत असलेल्या साहीलखान पठाण याने सदरील घटना मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. यातील दोन आरोपी पळून गेले. तर सद्दाम खानने पुतण्याला याबद्दल कुठेही सांगू नको म्हणून धमकी दिली व पुतण्याचा मोबाइल फोडून टाकला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

दरम्यान, महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास अधिकारी राकेश नेटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
Jalna Rape case: सरपण आणायला गेलेल्या मतिमंद महिलेला शेतात गाठलं, सामूहिक अत्याचाराने जालना हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल