Jalna Fraud: गाडीचे हप्ते थकले, पठ्ठ्यानं भलतंच डोकं लावलं, फायनान्स कंपनीला फसवलं, पण पोलिसांनी..
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna News: फायनान्सवर घेतलेल्या दुचाकीचे हप्ते तटल्याने जालन्यातील एकाने भलतंच डोकं लावलं. फायनान्स कंपनीची दिशाभूल केली पण तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
जालना: अनेकजण हप्त्यावर म्हणजेच फायनान्स कंपनीकडून ईएमआयवर गाडी किंवा इतर वस्तू घेत असतात. काहीवेळा परस्थितीमुळं गाडीचा हप्ता भरणं होत नाही आणि फायनान्सवाले गाडी देखील ओढून नेतात. तर कधी वादाचे प्रसंग देखील निर्माण होतात. परंतु, जालन्यातील एका पठ्ठ्यानं फायनान्सवाल्यांना फसवण्यासाठी वेगळंच डोकं लावलं. पण त्यामुळे तो वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एकाने फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून दुचाकी घेतली होती. परंतु, आर्थिक अडचणीमुळे गाडीचे काही हप्ते तटले होते. फायनान्सवाले अनेकदा गाडीचा हप्ता मागायला आले. संबंधितानं हप्ते भरलेच नाहीत. शेपटी फायनान्सवाल्यांनी गाडी ओढून नेण्याचा विचार केला. परंतु, त्यांना गाडी सापडलीच नाही.
advertisement
थेट नंबर प्लेटच बदलली
फायनान्सवाले हप्ता तटलेली गाडी खात्री करून उचलून घेऊन जातात. आता गाडी उचलून नेणार हे समजल्यावर संबंधित व्यक्तीनं भलतंच डोकं लावलं. आपल्याकडच्या दुसऱ्या एका गाडीची नंबर प्लेट या गाडीला लावली. फायनान्स कंपनीच्या ही बाब लक्षात न आल्याने तो बिनधास्तपणे ही गाडी वापरत होता.
पोलिसांच्या जाळ्यात
दुसऱ्या गाडीची नंबर प्लेट वापरून फायनान्सवाल्यांना हूल देता आली. परंतु, एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या दिसल्याने तो पोलिसांच्या कचाट्यात मात्र अडकला. बदनापूर तालुक्यातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पण फायनान्स कंपनीची दिशाभूल करण्याच्या प्रकाराची आता सर्वत्र चर्चा आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Mar 22, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Fraud: गाडीचे हप्ते थकले, पठ्ठ्यानं भलतंच डोकं लावलं, फायनान्स कंपनीला फसवलं, पण पोलिसांनी..









