TRENDING:

प्रेम की डिप्रेशन? साखरपुड्यानंतर तरुणीने कृष्णा नदीत घेतली उडी, आत्महत्येचं नेमकं कारण काय?

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील कराड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय कल्पना वाघमारे या तरुणीने सोमवारी रात्री कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कराड (सातारा) : सातारा जिल्ह्यातील कराड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा नदीच्या पुलावरून एका 26 वर्षीय तरुणीने नदीत उडी मारून आपले जीवन संपवले. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून, कल्पना बाळाप्पा वाघमारे असे या तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे, कल्पनाचा नुकताच 2 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. लग्नापूर्वीच तिने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime News
advertisement

क्षणाचाही विचार न करता मारली उडी

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजता कल्पना वाघमारे आपली दुचाकी घेऊन कृष्णा पुलावर आली. तिने पुलावर गाडी उभी केली आणि काही वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलत राहिली. त्यानंतर तिने क्षणाचाही विलंब न करता थेट नदीत उडी घेतली. हे पाहताच पुलावरील लोकांनी आरडाओरड केली आणि काही वेळातच पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली.

advertisement

बॅग आणि दुचाकीवरून मिळाली ओळख

स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना पुलावर तरुणीची दुचाकी आणि तिची बॅग आढळून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्पनाशी लग्न ठरलेला मुलगा आणि तिचे कुटुंबीय व नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तरुणीची बॅग आणि त्यातील वस्तू दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली. "कल्पनानेच नदीत उडी मारल्याचे यावरून स्पष्ट झाले," असे पोलिसांनी सांगितले. आपल्या मुलीने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळताच कल्पनाच्या आईने हंबरडा फोडला. वडिलांनाही जबर धक्का बसला. आईला सहन न झाल्याने नातेवाईकांनी तिला धीर देत तात्काळ रुग्णालयात नेले.

advertisement

तरुणीचा मृतदेह अजूनही नाही सापडला

दरम्यान, कल्पना वाघमारे एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. तिच्या बॅगमध्ये तिचे पाकीट, ओळखपत्र आणि इतर काही वस्तू होत्या. पोलिसांनी तात्काळ एनडीआरएफच्या पथकाला बोलावले असून, स्थानिक मच्छीमारही मदतीला आले आहेत. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा या तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

advertisement

हे ही वाचा : रक्ताच्या थारोळ्यात संपला संसार! मावशीसमोर चिरला पत्नीचा गळा, दारूड्या पतीचा भयंकर कांड! वाचा सविस्तर...

हे ही वाचा : "फोटो व्हायरल करेन!" ब्लॅकमेल करत केला अत्याचार, नराधमाने विवाहितेचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल!

मराठी बातम्या/क्राइम/
प्रेम की डिप्रेशन? साखरपुड्यानंतर तरुणीने कृष्णा नदीत घेतली उडी, आत्महत्येचं नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल