जळगाव: वैवाहिक जीवन म्हणजे प्रेम, आदर, आणि परस्परांना समजून घेण्याचा सुंदर प्रवास! मात्र, हे नाते कधी कधी वादांमुळे गुंतागुंतीचे होते. नवरा-बायकोच्या नात्यात मतभेद होणे ही सामान्य गोष्ट असली तरी कधी हा राग इतका टोकाला जातो की माणूस टोकाचे निर्णय घेतो. जळगावमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने घृणास्पद कृत्य केले आहे. भडगावमध्ये पतीने पत्नीच्या अंगावर कार घालून फरफटत नेत जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,
advertisement
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात पतीने पत्नीच्या अंगावर कार घालून पत्नीला फरपटत नेत जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत विवाहिता तृप्ती पवार ही गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भडगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने हे घृणास्पद कृत्य केलं असून याप्रकरणी पत्नीवर हल्ला करणारा रेवण प्रमोद पवार याच्याविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात मोठी खळबळ
दरम्यान भांडणाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान या सर्व प्रकाराचा पोलिस तपास करत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाल आहे.
पुण्यात पतीने रागात पत्नीची दुचाकी पेटवली
पती- पत्नीमध्ये झालेल्या भांडणावरुन पतीने रागाच्या भरात चक्क पत्नीची दुचाकी पेटवून दिली आहे. पुण्यातील गणेश पेठ भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेच्या माहेरी हा प्रकार घडला आहे. भर रस्त्यावर दुचाकी पेटवल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीचे काही कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे पत्नी रागात माहेरी भावाच्या घरी निघून गेली. पत्नीला आणण्यासाठी पती तिच्या घरी गेला मात्र पत्नीला येण्यास नकार दिला त्यानंतर संतापलेल्या पतीने दुचाकी पेटवली.
