आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार, देविका यांनी सुरू केली दुर्गम भागात शाळा, Video पाहून तुम्ही कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
देविका या गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजासाठी काम करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी त्यांनी एक शाळा सुरू केली.
पुणे : समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर आपण कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही ठिकाणाहून मदतीचा हात पुढे करू शकतो. पुण्यात राहणाऱ्या देविका घुले यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. देविका या गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजासाठी काम करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी त्यांनी एक शाळा सुरू केली. केवळ चार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास, आज 150 हून अधिक मुलांपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
देविका घुले यांनी सांगितलं की, देविका महिला मंडळ या संस्थेची स्थापना 1993 साली श्रीमती मीनाताई सूर्यवंशी यांनी केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील आणि वंचित महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. संस्था स्थापन झाल्यानंतर आम्ही आदिवासी भागातील लोकांसाठी काम सुरू केले. या कामादरम्यान आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आदिवासी मुले शाळेत जात नाहीत. ती मुलं शिक्षित व्हावीत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत म्हणूनच आम्ही सुरगाणा तालुक्यात ‘स्मार्ट किड्स स्कूल’ नावाची शाळा सुरू केली.
advertisement
शाळा सुरू केल्यानंतर सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. अनेक आदिवासी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नव्हते. त्यांना पटवून देण्यासाठी आम्हाला गावोगाव फिरावं लागलं, त्यांच्या शंका दूर कराव्या लागल्या. त्यांच्या मनात शिक्षणाचं महत्त्व निर्माण करावं लागलं. या सगळ्या नंतर आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली.
advertisement
सध्या शाळेत दीडशेहून अधिक मुलं शिक्षण घेत आहेत. शाळेत सध्या नर्सरी ते बालवाडीपर्यंतच शिक्षण दिलं जातं, मात्र पुढे आणखी वर्ग सुरू करण्याचं नियोजन आहे. या मुलांचं पुढचं शिक्षण खंडित होऊ नये म्हणून आम्ही त्यांना इतर शाळांमध्ये दाखल करून देतो, ज्यामुळे त्यांचं शिक्षण सुरू राहतं. या उपक्रमामुळे त्या भागात शिक्षणाबाबत मोठा बदल घडताना दिसत आहे. पालक आणि मुलांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढत असून गावकऱ्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक परिवर्तन होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 01, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार, देविका यांनी सुरू केली दुर्गम भागात शाळा, Video पाहून तुम्ही कराल कौतुक

