Success Story : हॉटेल बंद पडले पण हार नाही मानली, पुन्हा जोमाने सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 1 लाख कमाई
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
त्यांच्याकडचा मिसळपाव प्रसिद्ध आणि स्वादिष्ट असल्यामुळे खवय्ये दुरून नाश्ता करण्यासाठी येत असतात.
छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवरील गेवराई येथे कमलेश वैद्य हे 'हिरा हॉटेल' या नावाचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्याकडचा मिसळपाव प्रसिद्ध आणि स्वादिष्ट असल्यामुळे खवय्ये दुरून नाश्ता करण्यासाठी येत असतात. तसेच या ठिकाणी पोहे, रस्सा वडा, भजी यासह विविध पदार्थ मिळतात. या व्यवसायाच्या माध्यमातून वैद्य यांची दररोज 10 ते 15 हजार रुपयांची उलाढाल होते तर महिन्याला 3 लाखांची उलाढाल होत असून निव्वळ कमाई 1 लाख रुपयांपर्यंत होत असल्याचे वैद्य यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
कमलेश वैद्य यांची अगोदर एक हॉटेल होती पण काही कारणास्तव बंद झाली. नंतर दुसरीकडे 15 ते 20 वर्ष आचारी म्हणून काम केले व आता परत जोमाने स्वतःचे नाश्ता सेंटर सुरू केले आहे. मिसळ पाव आणि वडापाव हे प्रसिद्ध आहे त्यामुळे पैठणला जाणारे प्रवासी तसेच परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी या ठिकाणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.
advertisement
हिरा नाश्ता सेंटरमध्ये सर्व पदार्थ गरम दिले जातात, त्यामुळे ग्राहक प्रफुल्लित होते व पुन्हा या ठिकाणी येते. दररोज येथे बेसन पीठ 30 किलो तर तेल 20 लिटर लागते, तसेच सर्व पदार्थांमध्ये घरगुती स्वतः बनवलेले मसाले वापरले जातात, त्यामध्ये बटाटे चटणी, लाल मिर्च व शेंगदाणे चटणी यासह विविध प्रकारच्या चटण्या दिल्या जातात. सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा जास्त प्रतिसाद नव्हता मात्र कालांतराने पदार्थांमध्ये दर्जेदारपणा वाढवला आणि एक-एक करून ग्राहक येऊ लागले त्यामुळे आजच्या घडीला गर्दी येथे पाहायला मिळते, असे देखील वैद्य यांनी म्हटले आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 6:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Success Story : हॉटेल बंद पडले पण हार नाही मानली, पुन्हा जोमाने सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 1 लाख कमाई








