नाशिकच्या हरेश यांची कमाल, पक्षांसाठी बनवले सर्वात मोठे बर्ड फ्रिडर, गिनीज बुकमध्ये नोंदविले नाव, Video
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रशू प्राण्यांची सेवा करावी असे विचार घेऊन नाशिकच्या हरेश शहा यांनी एक स्वप्न पाहिले होते. पक्षांसाठी घर बनवणे, त्यांना अन्न पुरवावे अशी त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण देखील केली.
नाशिक : प्रशू प्राण्यांची सेवा करावी असे विचार घेऊन नाशिकच्या हरेश शहा यांनी एक स्वप्न पाहिले होते. पक्षांसाठी घर बनवणे, त्यांना अन्न पुरवावे अशी त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण देखील केली. फक्त पूर्णच नाही तर याच माध्यमातून त्यांनी एक व्यवसाय देखील सुरू केला. खिसा भरला असेल तर सेवा निरंतर काळ सुरू राहील या विचाराने त्यांनी अमि जीवदया या नावाने पक्ष्यांचे घर आणि अन्न खाण्यासाठी भांडी बनविणाऱ्या कंपनीची सुरुवात केली. त्याचबरोबर यांनी एकाच वेळेस सहा हजार पक्षी राहतील आणि खातील असे बर्ड फिडर देखील बनवून गिनीज बुकमध्ये नाव देखील नोंदविले आहे.
हरेश उच्च शिक्षित नसून देखील आज अनेक लोकांचे घर चालवत असतात. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव या ठिकाणी अमि जीव दया ही बर्ड फिडर आणि होम बनविण्याची कंपनी सुरू केली आहे. त्यांचे हे प्रॉडक्ट आज अनेक देशांमध्ये विक्री केली जात असते.
advertisement
शिक्षण 10 वी झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती खराब असल्याने पुढे शिक्षण त्यांना घेता आले नाही. यानंतर त्यांनी एका सोनारी दुकानात हेल्पर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यावेळेस त्यांचे मालक त्यांच्या समोर गोसेवा करत असे. आपण देखील समाजाचा एक भाग आहोत. आपल्याला देखील काही ना काही करायला हवे, परंतु पैशाअभावी शांत राहावे लागते, असे त्यांनी लोकल 18 सोबत बोलतांना सांगितले.
advertisement
यावेळी त्यांनी त्यांच्या धर्म गुरूंची भेट घेऊन आपल्या मनातील संकल्पना सांगितली. परंतु पैसे नाहीत, सेवा करायची यावर त्यांच्या गुरुंनी देखील त्यांना सांगितले, पैसे महत्त्वाचे नाहीत, तुम्ही कुठलीही सेवा केली तरी परमार्थ मिळतोच. या विचाराने त्यांनी पशू-पक्ष्यांची सेवा करण्यास ठरविले. काय करावे याकरता माहिती घेतल्या नंतर बाहेर देशात पक्ष्यांसाठी भांडी मिळतात. ते त्यांनी मागविले. भांडी आल्यानंतर आपण देखील असे बनवू जे आपल्या आजूबाजूचे लोक देखील घेतील आणि त्यांच्या हातून देखील सेवा सुरू होईल या विचाराने त्यांनी हे भांडी बनविण्याची सुरुवात केली.
advertisement
सुरवातीला पैसे नाहीत या कारणाने मन नाराज असल्याने ज्या ठिकाणी हरेश कामाला होते, त्या मालकांनी त्यांना पैसे दिले आणि तिथून त्यांच्या या मुख्य कामाची सुरुवात झाली. असा प्रॉडक्ट बनल्यानंतर देखील त्यांनी त्यांच्या दुकानातून विक्रीसाठी सुरुवात केली. दरम्यान त्यांचे हे भांडे आता प्रसिद्ध होऊ लागलेच होते, त्यावेळी त्यांना एका वृत्तपत्रामुळे नवीन ओळख मिळाल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
हरेश सांगतात, वृत्तपत्राच्या बातमीमुळे रात्रीतूनच माझे नशीब बदलले. त्या दिवसाच्या नंतर मला बाहेर देशातून, आजूबाजूतून मोठ्या प्रमाणात या वस्तूसाठी मागणी होऊ लागली आणि आज माझे हे प्रॉडक्ट संपूर्ण जगात पसरले आहे. तुम्हाला देखील पशू सेवा करायची असेल किंवा या सेवेतूनच व्यवसाय करावयाचा असेल, तर तुम्ही नक्कीच यांच्याशी त्यांच्या इंस्टाग्राम पेज amijivdaza याला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकणार आहात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 4:59 PM IST
मराठी बातम्या/नाशिक/
नाशिकच्या हरेश यांची कमाल, पक्षांसाठी बनवले सर्वात मोठे बर्ड फ्रिडर, गिनीज बुकमध्ये नोंदविले नाव, Video







