10th- 12th Board Exam Date: तयारीला लागा! दहावी- बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
10th- 12th Board Exam Date Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2025- 26 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर अजूनही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुरूवात नसेल केला तर आत्तापासून सुरूवात करा. कारण नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात फेब्रुवारी 2026 पासून परीक्षा सुरू होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन बुधवार, 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे, तर बुधवार, 18 मार्च 2026 रोजी शेवटचा पेपर असणार आहे. लेखी परिक्षेच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा होणार आहे. त्याचे देखील वेळापत्रक समोर आले आहे. लेखी आणि तोंडी अशा दोन्हीही परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आले आहे.
advertisement
बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रायोगिक (Practical), श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार, 23 जानेवारी 2026 ते सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या काळात विज्ञान शाखेच्या प्रायोगिक (Practical) परीक्षा, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा पूर्ण करण्यात येतील. तर, दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रायोगिक (Practical), श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला आता फक्त 4 महिनेच शिल्लक राहिलेत.
advertisement
राज्य शिक्षण मंडळाचे सचिव सचिव दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तोंडी परीक्षेच्या काळामध्येच इतरत्र स्कोअर करणाऱ्या विषयांच्याही परीक्षा शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यानुसार तयारी करून वेळेचे नियोजन करावे, असे शिक्षण मंडळाकडून करण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर पाहता येईल."
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 01, 2025 6:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
10th- 12th Board Exam Date: तयारीला लागा! दहावी- बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?


