OTT Most Watch : नका घालू कानात हेडफोन्स, अंगावर चादर घ्यायचीही गरज नाही; फॅमिलीसोबत बिनधास्त पाहा ही Web Series
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Most Watched Amazon Prime Series: ओटीटीवर वेब सीरिज किंवा सिनेमा पाहताना फॅमिलीपासून लांब बसावं लागतं. डोक्यावर पांघरूण आणि कानात हेडफोन्स घालावे लागतात. पण एक अशी वेब सीरिज जी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बिनधास्तपणे पाहू शकता.
अमेझॉन प्राइम व्हिडिओची सुपरहिट वेब सीरिज "मिर्झापूर" ने भारतीय विश्वात एक नवा रेकॉर्ड बनवला. 2018 मध्ये आलेल्या या सीरिजमध्ये बंदुका, शक्ती आणि गुंड राजकारणाचे इतक्या प्रभावी पद्धतीने चित्रण केले की त्याची खूप चर्चा झाली. सीरिजमध्ये अली फजल, दिव्येंदु, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी आणि श्रिया पिळगावकर यांच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत. मिर्झापूर आतापर्यंत 28.2 मिलियन लोकांनी पाहिली आहे. मिर्झापूरमधील गुन्हेगारीभोवती फिरते. मिर्झापूरचा राजा कालीन भैया शस्त्रांपासून अफूपर्यंत प्रत्येक बेकायदेशीर व्यवसायावर राज्य करतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमेझॉन प्राइम व्हिडिओची सर्वात लोकप्रिय सीरीज म्हणजे पंचायत. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुवीर यादव यांचा पावरपॅक अभिनय यात आहे. पहिल्या सीझनपासून ही सीरिज प्रेक्षकांना आवडली. पंचायतमध्ये गावातील साधेपणा, राजकारण आणि इमोशन्स दाखवण्यात आले आहेत. पंचायतचा चौथा सीझन लवकरच येणार आहे. ही सीरिज तुम्ही फॅमिलीसोबत पाहू शकता.


