Soybean Registration : शेतकऱ्यांनो, सोयाबीनची नाफेड नोंदणी आता करा मोबाईल वरून, या सोप्या स्टेप करा फाॅलो, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
खुल्या बाजारात मिळत असलेल्या कमी दरामुळे अनेक शेतकरी सरकारी हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री करणार आहेत. यासाठी नाफेड मार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जालना: खुल्या बाजारात मिळत असलेल्या कमी दरामुळे अनेक शेतकरी सरकारी हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्री करणार आहेत. यासाठी नाफेड मार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी शेतकरी स्वतः ई समृद्धी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकतात. ती कशी करायची जाणून घेऊया.
गुगल प्ले स्टोअर वरून ई समृद्धी हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन करायचा आहे आणि सर्वात आधी आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी द्वारे ॲपमध्ये लॉगिन करायचा आहे. लॉगिन केल्यानंतर आधार कार्ड प्रमाणे आपलं संपूर्ण नाव टाकायचं आणि आधार क्रमांक टाकायचा. यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशन केल्यानंतर आपली सर्व माहिती आपोआप भरली जाईल. यानंतर पुढील पेजवरती तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
advertisement
यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, तो अल्पभूधारक असल्यास त्या पद्धतीची माहिती, त्याचा प्रवर्ग, त्यानंतर शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा जीपीईजी फोटो दहा एमबी पेक्षा कमी आकाराचा जोडायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्राथमिक रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा पॉपअप मेसेज येईल, त्याचबरोबर टेक्स्ट मेसेज देखील येईल. यानंतर तुम्हाला बँक डिटेल या पर्यायावरती क्लिक करून सर्व बँक डिटेल व्यवस्थित भरायचे आहे.
advertisement
यामध्ये अकाउंट होल्डरचे नाव, बँकेचा आयएफसी कोड इत्यादी माहिती बरोबर भरून तुम्हाला दहा एमबी पेक्षा कमी आकाराचे पासबुक इमेज अटॅच करायची आहे. बँक डिटेल हा पर्याय व्यवस्थित फिलअप केल्यानंतर तुम्हाला योजना निवडायचे आहे. यामध्ये आपल्याला सोयाबीनचे रजिस्ट्रेशन करायचं असल्याने सोयाबीनशी संबंधित योजना निवडायची. ही सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप आहे.
advertisement
या ठिकाणी तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर, खाता क्रमांक यानंतर तुम्हाला तिसरे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे सातबारा अपलोड करावा लागेल. सातबारा अपलोड केल्यानंतर तुमचं नाफेड रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल. अशा पद्धतीने सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही नाफेडला सोयाबीनचे रजिस्ट्रेशन करू शकता.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 01, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Registration : शेतकऱ्यांनो, सोयाबीनची नाफेड नोंदणी आता करा मोबाईल वरून, या सोप्या स्टेप करा फाॅलो, Video

