2 तास 21 मिनिटांची देशातली पहिली हॉरर फिल्म, थरकाप उडवणाऱ्या कथा, धडकी भरवणारा शेवट OTT वर पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
India First Horror Film : हॉरर चित्रपटांची सध्या एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पण देशातला सगळ्यात पहिला हॉरर चित्रपट कोणता होता हे तुम्हाला माहिती आहे का? 76 वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट पाहताना आजही अंगावर शहारे येतात.
हॉरर चित्रपटांची (Horror Movie) सध्या चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. हॉरर जॉनर असणारे चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. एकीकडे हे चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहेत तर दुसरीकडे त्यांची झोपदेखील उडवत आहेत. पण देशातला पहिला हॉरर चित्रपट कोणता होता हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या
advertisement
advertisement
advertisement
'महल' या चित्रपटात अशोक कुमार आणि 15 वर्षांची मधुबाला मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा अशोक कुमार यांच्या पात्राभोवती फिरते, जे एका फार जुन्या वाड्यात राहायला जातात. तिथे त्यांची भेट रहस्यमय स्त्री, मधुबालाच्या पात्राशी होते. ती स्त्री स्वतःला अशोक कुमार यांच्या मागील जन्मातील प्रेयसी असल्याचे सांगते. हळूहळू चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते.
advertisement
advertisement
advertisement
अशोक कुमार आणि मधुबाला यांची जोडी त्याकाळी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्या काळातील चित्रपटांतील गाणी आजही क्लासिक मानली जातात. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. भयपट ‘महाल’ नेच भारतीय सिनेमात हॉरर विषयाची पायाभरणी केली आणि त्यानंतर अनेक भयपट आले. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच लोकप्रिय आहे.


