माधुरीचा सर्वात मोठा फॅन! फिल्म पाहायला बुक केलं अख्खं थिएटर; 1-2 नव्हे 73 वेळा पाहिलाय हा सुपरहिट सिनेमा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित चे आज जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. ब्रेन विथ ब्युटी असणाऱ्या 'धक धक गर्ल'ने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. माधुरीचं करिअर पीकवर असताना एक देशातला एक लोकप्रिय सेलिब्रिटी माधुरीसाठी वेडा झाला होता.
धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळीना माधुरीने वेड लावलं आहे. आजच्या घडीला माधुरी दीक्षित चित्रपटसृष्टीत कमी सक्रीय असली तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चेत असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लोकप्रिय चित्रकार हुसैन साहब माधुरी दीक्षितचे मोठे चाहते होते. पुढे अभिनेत्रीसोबत त्यांनी 'गजगामिनी' हा चित्रपट बनवला. 2000 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात माधुरी मुख्य भूमिकेत असून हुसैन साहब यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटात माधुरीसह शबाना आजमी आणि नसीरुद्दीन शाहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
advertisement
माधुरी दीक्षित 'भूल भुलैया 3' या चित्रपटात शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिने मंजुलिका हे पात्र साकारले होते. माधुरीने 1984 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि एकापेक्षा एक सुपरहिट, ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आजवर 'धक धक गर्ल'ने 70 पेक्षा अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.


