दारूच्या पारदर्शी ग्लासेसमधून ‘या’ गोष्टी दिसत नाहीत, पुण्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. कुलकर्णी यांनी सांगितला 25 वर्षांचा अनुभव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
दारुमुळे लिव्हरचं होणारं नुकसान सर्वांना ठाऊक आहे, पण दारू मेंदूवरही परिणाम करते हे मात्र अनेकांना माहित नाही.
मुंबई : आजच्या 'पार्टी कल्चर'मध्ये दारू ही फॅशन झाली आहे. इंस्टाग्राम रील्स, सिनेमे आणि जाहिरातींमध्ये दारूला ‘कूल’, ‘क्लासी’ आणि ‘स्मार्ट’ अशी प्रतिमा मिळते. लोकांना वाटू लागलंय की दारू पिणं म्हणजे मॉडर्न, स्ट्रेस-फ्री आणि नॉर्मल राहणं. पण, या 'कूल' दुनियेच्या मागे एक 'कठोर वास्तव' लपलेलं आहे जे पारदर्शक ग्लासेसमधून दिसत नाही.
पुण्याचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. कुलकर्णी गेली 25 वर्षं ICU मध्ये रुग्णांना ट्रिटमेंट देत आहेत.त्यांचं म्हणणं आहे “मी ज्यांच्या डोळ्यांत भीती पाहिलीये, ती फक्त आजाराची नाही, तर व्यसनाच्या पश्चात्तापाची असते.” त्यांनी सांगितलं की, दारू हे फक्त एक पेय नाही, तर हळूहळू शरीर आणि मन दोन्ही उद्धवस्त करणारा ‘सायलेन्सर’ आहे.
दारुमुळे लिव्हरचं होणारं नुकसान सर्वांना ठाऊक आहे, पण दारू मेंदूवरही परिणाम करते हे मात्र अनेकांना माहित नाही. दीर्घकाळ दारू घेतल्याने cerebral atrophy म्हणजे मेंदू ‘सुकतो’. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, निर्णयक्षमता हरवते आणि व्यक्तिमत्त्व बदलतं. दारू पिणाऱ्याला स्वतःच्या कृतींची जाणीवही राहत नाही.
advertisement
डॉ. कुलकर्णी सांगतात की दारूने हृदयाचा ठोका अस्थिर होतो, ECG मध्ये ‘irregular rhythm’ दिसते. अनेक रुग्णांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. “दारू घेतो पण मर्यादित प्रमाणात” असं म्हणणारे अनेक तरुण रुग्ण नंतर ICU मध्ये दाखल होतात, असं ते म्हणतात.
पचनशक्ती, स्नायू आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा बळी पडतात. दारू शरीराची ताकद कमी करते, स्नायू कमकुवत करते आणि शरीराला आजार पटकन होतात.
advertisement
दारू हळूहळू ‘कूल’ झाली… पण ICU मध्ये श्वासोच्छ्वासासाठी झगडणारा रुग्ण कुणी दाखवतंय का?
सध्या सोशल मीडियावर, सिनेमात, पार्टी कल्चरमध्ये दारूला ‘क्लासी’, ‘स्मार्ट’, ‘स्ट्रेस रिलीज’ वगैरे टॅग्स मिळतात.
म्हणजे दारू पिणं हे एक मॅच्योर, मॉडर्न, नॉर्मल वागणं वाटू लागलंय.
पण…
२५…
— Dr Ravindra L. Kulkarni MD (@KulkarniRL) November 1, 2025
advertisement
डॉ. कुलकर्णी यांचं स्पष्ट मत आहे की, "दारूला 'स्टेटस सिंबल' बनवणं म्हणजे समाजात एक 'टॉक्सिक कल्चर’ निर्माण करणं." जेव्हा पालक, मित्र किंवा सोशल मीडियावरचे इन्फ्लुएंसर्स दारूला ‘नॉर्मल’ म्हणून सादर करतात, तेव्हा तरुणांमध्ये तिचं आकर्षण वाढतं. परिणामी अपघात, हिंसा, कौटुंबिक वाद आणि गुन्हेगारी वाढते, त्यांच्यानुसार, "दारू प्यायल्यावर जबाबदारीची भावना हरवते. म्हणूनच रॅश ड्रायव्हिंग, अपघात, आणि रस्त्यावरचे वाद हे प्रकरणं बहुतांशी ‘दारूच्या नशेत’ घडतात."
advertisement
शेवटी डॉ. कुलकर्णी सांगतात "दारू ही coping skill नाही, ती एक chemical trap आहे. फक्त शरीर नव्हे, तर नाती आणि स्मरणशक्तीही ती हळूहळू हिरावते. म्हणून आजच ठरवा पिणं थांबवा, किंवा किमान जबाबदारीने प्या. कारण सजगतेतूनच जीवन वाचतं, संमतीतून नाही."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दारूच्या पारदर्शी ग्लासेसमधून ‘या’ गोष्टी दिसत नाहीत, पुण्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. कुलकर्णी यांनी सांगितला 25 वर्षांचा अनुभव


