ही घटना आज सकाळी सुमारे आठ वाजता उरला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर नगरमध्ये घडली. आरोपी प्रदीप देवांगन याने त्याची आई गणेशी (वय 70) यांच्याकडे कुत्रे खरेदी करण्यासाठी दोनशे रुपये मागितले होते, असे उरला पोलीस ठाण्याचे प्रभारी बी.एल. चंद्राकर यांनी सांगितले.
प्रदीपला जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे खरेदी करायचे होते.ज्याची किंमत आठशे रुपये होती.प्रदीपजवळ सहाशे रुपये होते आणि त्याने आईकडे दोनशे रुपयांची मागणी केली होती. जेव्हा त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा प्रदीपने हातोड्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. पोलिसांनी सांगितले की, त्याने आपली पत्नी रामेश्वरी यांच्यावरही हल्ला केला.
advertisement
प्रदीप ई-रिक्षा चालवतो आणि त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. घटनेनंतर प्रदीपच्या 15 वर्षाच्या मुलाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रदीप घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर मुलाने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि पोलिसांना याबाबत कळवण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गणेशी यांचा मृत्यू झाला. रामेश्वरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रदीपला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.