आरोपी अल्पेश कुवरलाल पटेल याने मृतक आकाश लक्ष्मण दानवे (वय 21) वर्ष याला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली. यानंतर मृतक तरुणाने सांगितलं, की पैसे सायंकाळी फोन पेने पाठवतो. त्यावर आरोपीला विश्वास बसला नाही, त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की आरोपीने आकाश लक्ष्मण दानवे गळा आवळला. त्यात आकाश हा बेशुद्ध होऊन खाली कोसळला.
advertisement
Palghar Crime : प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपी प्रियकराचाही धक्कादायक शेवट
त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आलं. तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आलं. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आकाशला मृत घोषित केलं. ही घटना बोदा या गावात घडली. दवनीवाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत तरुणाचं शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे बोदा या गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपीला दवनीवाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
