Palghar Crime : प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपी प्रियकराचाही धक्कादायक शेवट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मोखाडा येथे विद्यार्थिनीवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीनेही आत्महत्या केली आहे. मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली
पालघर, 07 ऑक्टोबर (राहुल पाटील, प्रतिनिधी) : मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. अर्चना उदर या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना रस्त्यात हत्या झालेली. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मोखाडा येथे विद्यार्थिनीवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीनेही आत्महत्या केली आहे. मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. प्रभाकर वाघेरा असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
विद्यार्थिनीची केलेली हत्या
आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना आरोपीने विद्यार्थीनीची हत्या केली होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे समोर आली. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.
advertisement
अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला होता. अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जमलं होतं. यातून तिची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर आता आरोपीनेही गळफास घेतला आहे. मात्र, विद्यार्थिनीच्या झालेल्या या हत्येनंतर आश्रम शाळांमधील विद्यार्थिनी भीतीच्या छायेखाली आहेत.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
October 07, 2023 9:39 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Palghar Crime : प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपी प्रियकराचाही धक्कादायक शेवट


