Dhurandhar: अक्षय खन्नाच्या जबरदस्त एन्ट्रीमुळे व्हायरल झालं FA9LA Song, पण गाण्याचा नेमका अर्थ काय? Lyrics वाचून बोबडी वळेल

Last Updated:
FA9LA Song Meaning: अक्षय खन्नाच्या धमाकेदार एंट्रीने भरलेले 'FA9LA' (फासला) हे गाणे सध्या चार्टबस्टर ठरले आहे, पण गाण्याचे नेमके बोल आणि अर्थ काय आहे?
1/7
मुंबई: अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' चित्रपटातील दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय नसला तरी, चित्रपटातील त्याची एंट्री आणि त्यावरील गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे गाणे इतके व्हायरल झाले आहे की, लोक ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि अक्षय खन्नाच्या डान्स मूव्ह्सवर थिरकत आहेत.

advertisement
2/7
अक्षय खन्नाच्या धमाकेदार एंट्रीने भरलेले 'FA9LA' (फासला) हे गाणे सध्या चार्टबस्टर ठरले आहे, पण प्रेक्षकांना या गाण्याबद्दल एकच अडचण आहे, ती म्हणजे गाण्याचे बोल पकडता येत नाहीत आणि त्याचा अर्थही समजत नाही! हे गाणे ऐकून अनेकांना 'ॲनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' या गाण्याची आठवण झाली आहे.
अक्षय खन्नाची धमाकेदार एंट्री असलेले 'FA9LA' (फासला) हे गाणे सध्या चार्टबस्टर ठरले आहे, पण प्रेक्षकांना या गाण्याबद्दल एकच अडचण आहे, ती म्हणजे गाण्याचे बोल पकडता येत नाहीत आणि त्याचा अर्थही समजत नाही! हे गाणे ऐकून अनेकांना 'ॲनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' या गाण्याची आठवण झाली आहे.
advertisement
3/7
'FA9LA' हे गाणे बहारिनचा रॅपर फ्लिप्पराची याने गायले आहे. या गाण्याच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची डीप बेसलाइन, जबरदस्त बीट्स आणि अनोखी अरेबिक रॅप वाइब. चित्रपटात अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेला सुरुवातीपासूनच एक प्रभावी आणि 'लार्जर-दैन-लाईफ' लूक देण्यासाठी या ट्रॅकचा उपयोग करण्यात आला आहे.

4/7
या गाण्याचे बोल आहेत : या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह | या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह | या अखी डस डस ‘इंदी खोश फसलाह | या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह |

5/7
'FA9LA' चा अर्थ आहे 'मस्ती करण्याचा काळ', 'पार्टी' किंवा 'धमाल'! या गाण्यात अनेक अरेबिक ओळींचा वापर करण्यात आला आहे, ज्यात जोश, मजा आणि उत्साहाचे भाव व्यक्त केले आहेत. या गाण्याचा मूळ भाव हा डान्स, धमाल आणि निर्धास्त आनंद साजरा करणे हा आहे.

6/7
मित्रांना नाचायला, ताल धरायला आणि पूर्ण उत्साहाने थिरकायला हे गाणे प्रेरित करते. हा क्षण खास आहे आणि नशिबाने तो खास तुमच्यासाठीच तयार केला आहे, ही भावना गाण्यात वारंवार व्यक्त होते.

7/7
या गाण्याचा अर्थ : मित्रा, जोरात नाच, आज मी भरपूर मस्ती करायच्या मूडमध्ये आहे... मित्रा, सर्व सोड, तुला देवाची शपथ, चल एक मस्त डान्स करू... मित्रा, तुझ्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त डान्स स्टेप आहे... त्याचं नाव सबूहा आहे, नशिबाने हे तुझ्यासाठीच लिहिलं आहे... तुझा हात वर कर आणि ताल धर... तुझ्या खांद्यांना जोरात हलव आणि तुझ्यातली एनर्जी अशीच राहू दे...

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement