Kia मोटर्सचा मोठा धमाका, अखेर भारतात आणली हायटेक Seltos, लूक पाहून पडाल प्रेमात
- Published by:Sachin S
Last Updated:
दक्षिण कोरियन कंपनी किया मोटर्स इंडियानेही आता आपली लोकप्रिय Kia Seltos 2025 लाँच केली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर Kia Seltos चा नवीन अवतार कंपनीने आणला आहे. हाय टेक डिझाइन, लेव्हल-2 ADAS सेफ्टी आणि दमदार इंजिनचा ऑप्शन दिला आहे.
भारतात गेल्या काही दिवसांपासून SUV गाड्यांचा हंगाम आला आहे. एकापेक्षा एक SUV लाँच करण्याचा कंपन्यांनी धडाका लावला आहे. दक्षिण कोरियन कंपनी किया मोटर्स इंडियानेही आता आपली लोकप्रिय Kia Seltos 2025 लाँच केली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर Kia Seltos चा नवीन अवतार कंपनीने आणला आहे. आता नवीन Kia Seltos 2025 ही प्रीमियम आणि टेक्नालॉजीने सुसज्ज आहे. हाय टेक डिझाइन, लेव्हल-2 ADAS सेफ्टी आणि दमदार इंजिनचा ऑप्शन दिला आहे.
advertisement
advertisement
Kia Seltos 2025 चा बंपर हा Digital Tiger Face ग्रिल, ब्लॅक हाय-ग्लॉसी फिनिश आणि डार्क गनमेटल एक्सेंटमुळे आणखी प्रीमियम असा लूक देतोय. Kia Seltos 2025 मध्ये आईस क्युब LED हेडलॅम्प्स आणि स्टार मॅप LED DRLs दिले आहे, त्यामुळे रात्रीच्या प्रवासात ही एसयूव्ही उत्तम अशी दृश्यमानता देईल. सोबतच मागच्या बाजूला कनेक्टेड LED टेललॅप्स दिले आहे.
advertisement
advertisement
Kia Seltos 2025 मध्ये तब्बल १० रंगाचा मोनो टोन पर्याय दिला आहे. यामध्ये दोन नवीन रंग ‘Morning Haze’आणि ‘Magma Red’ चा समावेश आहे, जे पहिल्यांदाच Kia इंडियाने भारतात आणला आहे. Kia Seltos 2025 च्या इंटिरियरबद्दल बोलायचं झालं तर केबिन एकदम फ्रेश आणि प्रीमियम अशीच आहे, स्मोकी ब्लॅक आणि व्हाइट टू-टोन इंटीरिअर, व्हाइट एक्सेंट आणि लेदरेट सीट्स दिले आहेत. डॅशबोर्डवर 30 इंचाचा एका मोठा ट्रिनिटी पॅनोरमिक डिस्प्ले दिला आहे. तसंच स्टेअरिंग व्हिल सुद्धा आकर्षक आणि स्पोर्टी लूक दिसेल असंच आहे.
advertisement
Kia Seltos 2025 मध्ये ड्रायव्हरचे सीट पॉवर अॅडजस्टमेंटसह येतंय. ज्यामध्ये लंबर सपोर्ट आणि रीलॅक्स फंक्शन दिलं आहे. एवढंच नाहीतर सीट हे ORVM सेटिंगशी जोडलेले आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान ड्रायव्हरची जागा ही आपोआप चांगली होईल. Kia Seltos 2025 मध्ये Bose चे 8-स्पिकर साउंड सिस्टम दिली आहे. सोबतच 64-कलर एम्बिएंट लायटिंग दिली आहे, ज्यामुळे केबिनचा मूड चांगला होईल. यासोबत वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पॅनोरमिक सनरूफ आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्लायन एडजस्टमेंट, सनशेड कर्टन आणि टाइप-C चार्जिंग पोर्ट्स दिले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किया मोटर्सने अद्याप Kia Seltos 2025 ची किंमत जाहीर केली नाही. ११ डिसेंबरच्या रात्रीपासून प्री बुकिंग सुरू झालं आहे. २५ हजार रुपयांमध्ये Kia Seltos 2025 चं प्री बुकिंग करता येणार आहे. २ जानेवारी २०२६ रोजी या एसयूव्हीच्या किंमतीबद्दल घोषणा करण्यात येईल आणि एसयूव्हीची डिलेव्हरी फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात होईल.








