बेगूसराय - गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना घडत आहेत. तसेच विविध वादातून हत्येच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरांना मजुरीच्या पैशाच्या बदल्यात दारू दिली जात होती. मात्र, एक दिवस मजुराने मजुरी मागताच पैशाच्या बदल्यात त्याला मृत्यू देण्यात आला.
advertisement
बिहारमध्ये नीतीश कुमार यांच्या सरकारने 1 एप्रिल 2016 पासून दारूबंदी लागू केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी दारू विक्री सुरू आहे. तसेच विषारी दारूने अनेकांचे प्राणही गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छपरा, सीवान आणि गोपालगंज येथील 45 जणांना विषारी दारू प्यायल्याने आपले प्राण गमवावे लागले. यातच आता 1 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीचा दारुच्या नशेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
विषारी दारू प्यायल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असा दावा स्थानिकांनी केला आहे. बेगुसराय याठिकाणी ही घटना घडली. यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी लोकल18 च्या टीमने मृत व्यक्तीच्या पत्नीशी संवाद साधत नेमकं काय घडलं, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
राम जीवन साह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दारू प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला. तो बेगूसराय येथून 5 किमी अंतरावर जिन्देंपुर गावातील रहिवासी होता. घटनेची माहिती मुस्फिल पोलिसांना देण्यात आली. मात्र, घटनास्थळापासून नीमा चांदपुरा पोलीस ठाणे जवळ आहे.
बेगूसरायचे एसपी मनीष कुमार यांनी प्रेस रिलीज जारी करत सांगितले की, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. तर पोलीस तक्रारीची वाट पाहत असून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे सरपंच आणि नातेवाईकांनी सांगितले.
दारू पिऊन नवरा आला खोलीत अन्.., ट्रिपवर आलं होतं कपल, नेमकं काय घडलं?
कामाच्या बदल्यात मिळायची दारू -
शनिवारी लोकल18 च्या टीमने मृत व्यक्तीचे गाव जिनेदपुर याठिकाणी मृताची पत्नी दौलती देवीशी संवाद साधला. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. मृतकाची पत्नी आणि गावातील लोकांनी सांगितले की, घरापासून 500 मीटर अंतरावर बलिया वाली उर्फ जगतारण देवी दारुचा व्यवसाय करते.
याठिकाणी मृत राम जीवन साह हा मागील 1 वर्षांपासून मजुरीचे काम करत होता. त्या बदल्यात त्याला पैसे नव्हे तर दारू दिली जात होती. शुक्रवारी नेहमीप्रमाणे मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती घरातून पैसे मागण्याचा इशारा करत घरातून निघाला मात्र नंतर त्याच्या मृत्यूची सूचना मिळाली.
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला असता तेथून दारू जप्त करण्यात आली. डीएसपी सुबोध कुमार यांनी सांगितले की, राम जीवन साह याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पोलीस कसुन चौकशी करत असून दोषींवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे.