दारू पिऊन नवरा आला खोलीत अन्.., ट्रिपवर आलं होतं कपल, नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
couple dispute - एक दाम्पत्य नैनिताल फिरायला आले होते. रविवारी हल्द्वानी पोहोचल्यावर पतीचे मन बदलले आणि पतीने याचठिकाणी नैनीताल रोडवर एका हॉटेलमध्ये खोली घेतली. तर पत्नीला यादिवशी नैनीताल फिरायची इच्छा होती. मात्र, पतीने हल्द्वानी येथे खोली घेतल्यावर पत्नीच्या मनात राग होता.
तनुज पांडे, प्रतिनिधी
नैनीताल : गेल्या काही दिवसात पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत. विविध कारणातून दोघांमध्ये वाद होऊन या वादाचे रुपांतर अनेकदा धक्कादायक घटनांमध्ये झाल्याचेही समोर आले आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुडगावरुन एक दाम्पत्य नैनीताल फिरायला आले होते. मात्र, हल्द्वानी पोहोचल्यावर एका हॉटेलमध्ये पती पत्नीमध्ये लहानशा गोष्टीवरुन वाद झाला. यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यानतंर हे प्रकरण इतके वाढले की पोलिसांना बोलवावे लागले. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांची समजूत घातली.
advertisement
हल्द्वानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडगाव येथील एक दाम्पत्य नैनिताल फिरायला आले होते. रविवारी हल्द्वानी पोहोचल्यावर पतीचे मन बदलले आणि पतीने याचठिकाणी नैनीताल रोडवर एका हॉटेलमध्ये खोली घेतली. तर पत्नीला यादिवशी नैनीताल फिरायची इच्छा होती. मात्र, पतीने हल्द्वानी येथे खोली घेतल्यावर पत्नीच्या मनात राग होता.
लग्नाचे आमिष देत खासगी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्तेजित केले अन् मग..., बॉयफ्रेंडने केलं हादरवणारं कृत्य
advertisement
दुसऱ्या दिवशी सकाळी पती दारू पिऊन खोलीत आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. मात्र, या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. हा सर्व प्रकार पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही पती पत्नीला थांबवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दाम्पत्याने त्यांचे ऐकले नाही. यानंतर हॉटल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना 112 या क्रमांकावर कॉल करत या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
पोलिसांना पाहून दोन्ही जण शांत झाले. यानंतर पोलिसांनी तब्बल 1 तास त्यांचे समुपदेशन केले आणि त्यांना समज देऊन शांत केले. यानंतर दोन्ही जण नैनीताल याठिकाणी रवाना झाले, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, या घटनेची सर्वत्र एकच चर्चा होत आहे.
Location :
Nainital,Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
November 05, 2024 2:50 PM IST