लग्नाचे आमिष देत खासगी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्तेजित केले अन् मग..., बॉयफ्रेंडने केलं हादरवणारं कृत्य
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - मागील एका वर्षापासून त्याचे आणि महिलेचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष देऊन महिलेला विश्वासात घेतले आणि तिला तिचे खासगी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्तेजित केले.
ईशा बिरोरिया, प्रतिनिधी
ऋषिकेश : गेल्या काही दिवसात नात्यात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची फसवणूक करत तिचा खासगी व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवला.
काय आहे संपूर्ण घटना -
प्रदीप चंद्र (वय 26, गाव-टोला, तालुका-यमकेश्वर), प्रदीप कुमार (वय 31, गाव-पाटणा, तालुका- यमकेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. मागील एका वर्षापासून प्रदीप चंद्र आणि पीडित महिलेचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष देऊन महिलेला विश्वासात घेतले आणि तिला तिचे खासगी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्तेजित केले. तसेच त्याने या महिलेचे हे खासगी व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मागवल्यावर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप या महिलेने केले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करुन त्वरित कार्यवाही केली. डेहराडूनच्या ऋषिकेशमध्ये ही घटना घडली.
advertisement
मित्रानेही केले ब्लॅकमेल -
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप चंद्रने हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या असलेल्या प्रदीप कुमार नावाच्या व्यक्तीलाही पाठवला. प्रदीप कुमारने तो व्हिडिओ पाहून महिलेला ब्लॅकमेल केले आणि शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने विरोध केला असता दोघांनी व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
महिलेच्या तक्रारीवरुन ऋषिकेश पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य पाहून तातडीने आवश्यक पुरावे गोळा करून आरोपींवर कठोर कारवाई करावेत, असे निर्देश डेहराडूनच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी (एसएसपी) पोलीस पथकाला दिले.
आरोपींना अटक -
पोलिसांनी तत्काळ आपल्या तपासाची चक्रे फिरवत 2 आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. यानंतर पुरावा आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. प्रदीप चंद्र (वय 26, गाव-टोला, तालुका-यमकेश्वर), प्रदीप कुमार (वय 31, गाव-पाटणा, तालुका- यमकेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
November 05, 2024 12:48 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाचे आमिष देत खासगी व्हिडिओ बनवण्यासाठी उत्तेजित केले अन् मग..., बॉयफ्रेंडने केलं हादरवणारं कृत्य