दुल्हन लुटेरी गँग सक्रीय
मंठा येथे 16 मार्च रोजी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर 21 मार्च रोजी नाव्हा रोडवरील माळाचा गणपती इथे हे लग्न झाले. नातेवाइकांना भेटायचे म्हणून दुसऱ्या वाहनात जाऊन बसत 5 लाख रुपये घेऊन नवरी व तिच्यासोबत असलेले नातेवाईक फरार झाले. या घटनेतून 'लुटेरी दुल्हन' पुन्हा सक्रिय झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात नवरी, तिची बहीण, तिची आई, मामा अशा चार जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
सोशल मीडियावरून लव्ह मॅरेज, नंतर जे कळलं ते खतरनाक! नवऱ्यानं आईसोबत मिळून केलं...
नेकमं घडलं काय?
बदनापूर तालुक्यातील सदाशिव वेताळ हे भावाच्या लग्नासाठी मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, नातेवाइकांकडे मुलाचा बायोडाटाही पाठवला होता. एका महिलेने फोनवर संपर्क करून आमच्याकडे मुलगी आहे म्हणत व्हॉट्सअॅपवर मुलीचे फोटो पाठवले. यानंतर 16 मार्च रोजी मंठ्यात जाऊन मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास माळाचा गणपती मंदिरात लग्न लागले. नवरीला कारमधून गावाकडे घेऊन जात होते.
जालना शहरातील मंठा चौफुलीजवळ दुसऱ्या कारच्या चालकाने नवरी असलेल्या कारच्या चालकाला इशारा करत थांबायला लावले. नवरी व तिच्यासोबत असलेल्या मुलीने आम्ही नातेवाइकांना भेटून येतो, असे म्हणत गाडीखाली उतरून त्या दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसल्या. यानंतर ते कारने पळून गेले. या प्रकरणात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधार कार्ड बनावट
मराठवाड्यात लग्नातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लग्नासाठीची मुलगी आणि तिचे नातेवाईक यांचे आधारकार्ड बनावट असते. त्यामुळे पोलिसांना तपासात देखील अडचणी येतात. गणपती माळ येथे लागलेल्या या लग्नाच्या प्रकरणात लग्न लावून देणारे महाराज यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे लग्न लावले, या कागदपत्रांचीही पोलिसांच्या तपासाला मदत होणार आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या काही तासांत आरोपी असलेल्या महिलांनी 5 लाख रुपयांची रक्कम घेतली. मंदिरात असलेल्या ब्राह्मणाने सर्व विधी करून लग्न लावून दिले आणि लग्न लागल्यानंतर नवरी मुलगी फरार झाली. या प्रकाराची सर्वत्र चर्च आहे.