मुंबईतील नामांकित शाळा...
मुंबईच्या माहिम भागात असलेली,आपल्या देशातील अत्यंत प्रतिष्ठित शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे. या शाळेतील शिक्षणही अत्यंत महागडं आहे. बडे राजकीय नेते, मोठमोठे कॉर्पोरेट, बडे सरकारी अधिकारी यांची मुलं या शाळेत शिक्षण घेतात. नेहमीच अनेक कारणांनी ही शाळा चर्चेत असते. मात्र, समाजातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या शाळेतील टीचर,असेही अनैतिक धडे विद्यार्थ्यांना देत असेल,हे धक्कादायक आहे.
advertisement
कोण आहे ही शिक्षिका?
चाळीशी ओलांडलेल्या या शिक्षिकेचं कुटुंब अत्यंत सुखवस्तू मानलं जातं. आपल्या कामात अत्यंत पारंगत मानल्या जाणाऱ्या या शिक्षिकेचं कुटुंबही चौकोनी आहे. एका मोठ्या कॉर्पोरेट मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारा नवरा आणि दोन अपत्यं असं त्यांचं कुटुंब आहे. तिची मुलांची वये ही पीडित मुलापेक्षा काही वर्षच लहान असल्याची माहिती समोर आली आहे.
कसं केलं मुलाचं लैंगिक शोषण?
शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या या मुलाची शरीरयष्टी तशी, वयापेक्षा अधिक जास्त वाटणारी होती. 2023 च्या डिसेंबर महिन्यात, डान्स स्टेप शिकवताना टीचर या मुलाकडे आकर्षित झाली आणि नृत्य शिकवण्याच्या नावाखाली तिने सलगी वाढवत गेली. अनेक ठिकाणी सहेतुक स्पर्श करीत या विद्यार्थ्याला तिनं जाळ्यात ओढायचा जोरदार प्रयत्न केला. या, विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी या आधुनिक मेनकेनं,चक्क तिच्याच एका मैत्रिणीची मदत घेतली.
मदत करणारी ती मैत्रीण कोण?
या सुंदर शिक्षिकेची, तितकीच सुंदर असलेली ती मैत्रीण, व्यवसायानं चक्क डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाला मैत्रीण डॉक्टरनं संपर्क साधला आणि चक्क अजब युक्तिवाद केला. ऐसा तो अपने सोसायटी मे चलता है, खुद को नसीबवाला समझो, ये तो प्रॅक्टिकल सेक्स एज्युकेशन है, असं समजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुलावर अत्याचाराची सुरुवात...
लैंगिक भावनेने पछाडलेल्या या शिक्षिकेनं अवघ्या महिनाभरातच या पीडित विद्यार्थ्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. या शिक्षिकेच्या सेडान कारमध्ये त्याच्यावरील अत्याचाराची सुरुवात झाली. त्यानंतर मग कधी पंचतारांकित हॉटेल तर कधी फ्लॅटमध्ये सुरुवात झाली. याच दरम्यान, या शिक्षिकेने आपल्या या प्रिय विद्यार्थ्याला मद्य प्राशनाचीही दीक्षा दिली.
असा उघड झाला अत्याचार...
तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असल्यासारखे सतत आणि अनेकदा लैंगिक शोषण सुरू असल्यानं, या विद्यार्थ्याच्या वागणुकीत झालेला बदल त्याच्या पालकांना जाणवायला लागला. त्याला विश्वासात घेतल्यानंतर समजलेल्या या घटनेनं पालकही चक्रावून गेले. या पालकांची ओळखही, मुंबईत अत्यंत प्रतिष्ठित वर्गात मोडणारी आहे. परीक्षा तोंडावर असल्यानं, काही महिने शांत राहण्याची भूमिका घेत पालकांनी संयम बाळगला. परीक्षा झाली,निकाल लागला, मुलाचा अकरावीत प्रवेश झाला आणि लागलीच पालकांनी पोलिसांना संपर्क साधला. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यानं, अतिवारिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी, या आरोपांची पडताळणी केली अखेर गुन्हा दाखल करून या शिक्षिकेला जेरबंद केलं. पोस्को कायद्याअंतर्गत ही टीचर सध्या पोलिस कोठडीत आहे.
आणखी विद्यार्थीदेखील जाळ्यात अडकले?
या लैंगिक शोषणात हा एकटाच विद्यार्थी पीडित आहे का अजून इतरही विद्यार्था अडकले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याशिवाय, या शिक्षिकेच्या डॉक्टर मैत्रिणीने अजून कुणासाठी मदत केली आहे का ? याचाही तपास सुरू आहे.