नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या महात्मा फुले नगर येथे काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डीजे लावण्यात आला होता. मात्र डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे या 23 वर्षीय युवकाला त्रास झाला. त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. त्यामुळे त्याला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. डीजे च्या आवाजाने नितीन रणशिंगे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
advertisement
डीजेमुळे नाहीतर कशामुळे झाला मृत्यू?
तीन पुतळ्याजवळ डीजे साऊंड सिस्टीम लावून आंबेडकर जयंती साजरी केली जात होती. मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी डिजेवर डान्स करत होते.तरुण-तरुणींना नाचताना पाहून नितीन देखील डिजेसमोर जाऊन डान्स करू लागला. बेधुंद होऊन डान्स करत असताना अचानक नितीनच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर नितीनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याची प्राणज्योत मालवली.
डीजेमुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाल्याने पोलिसांनीदेखील या प्रकरणाचा तपास सुरू केला. पंचवटी पोलिसांनी अधिक तपास करून गेल्या चार वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नितीनचा मृत्यू झाल्याचा पोलीस तपासात समोर आल आहे. नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये नितीन वर गेल्या चार वर्षांपासून उपचार सुरू होते. मात्र तो सध्या नाशिकमध्ये त्याच्या घरी होता. या दरम्यानच त्याला अधिकचा त्रास होऊ लागला आणि उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.