मुलींशी बोलतोय म्हणून मारहाण
सविस्तर माहिती अशी की, नीट परीक्षेची तयारी करण्याची 17 वर्षांचा तरूण छत्रपती संभाजीनगरात अभ्यास करण्यासाठी आला होता. तोे ट्यूशन घेत होता. त्यादिवशी हा तरुण दोन मुलींसोबत प्रोझोना माॅलमध्ये फिरत होता. सायंकाळी माॅलमधून ते बाहेर पडले. दुचाकी काढत असताना तिथे अचानक एका स्पोर्ट्स बाईकवर दोघेजण आले. त्यांनी या तरुणांची बाइक ताब्यात घेतली. त्याला मध्ये बसवलं आणि एन-1 च्या पिरॅमिड चौकाच्या दिशेने घेऊन गेले.
advertisement
जंगलात नेऊन जीवे मारण्याची दिली धमकी
त्यानंतर आणखी 7-8 टवाळखोरांनी त्याला पडेगावच्या जंगलाच्या दिशेने नेले. या टोळीने जंगलात नेऊन 'तू त्या मुलींसोबत का बोलतो', म्हणते लाथा-बुक्क्या आणि बेल्टेने मारहाण केली. झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना सांगितलं की, मारून टाकू अशी धमकीही या टोळीने दिली. पण 9 वाजता पोलिसांनी या तरुणाचे अपहरण झाले असे टोळीला समजले. तेव्हा त्यांनी त्या तरुणाला जालना रस्त्यावर आणून सोडलं. त्यानंतर हा तरुण पिरॅमिड चौकापर्यंत पोहोचला. संबंधित घटनेचा तपास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याची उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे करत आहेत.
हे ही वाचा : बहिणीच्या छळाचा घेतला बदला! वाटेतच जावयाला गाठलं अन् सुपारी देऊन मेहुण्याने संपवलं, वाचा सविस्तर
हे ही वाचा : देव तारी त्याला कोण मारी! मृत्यूच्या दाढेतून 'हे' बाळ तीनदा परतलं; CCTV तपासले आणि पोलिसही चक्रावले
