वाहन चोरी टोळीचा पर्दाफाश
तपासादरम्यान पोलिसांनी 5 जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी 2 जण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून तब्बल 20 नवीन बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची चौकशी केली असता एका मोठ्या वाहन चोरी टोळीचा पर्दाफाश झाला. जप्त केलेल्या बाईक्सची किंमत 25 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना नवीन मॉडेलच्या बाईक्स चालवण्याचा आणि नवीन बूट व कपडे घालण्याचा शौक होता. हा शौक पूर्ण करण्यासाठीच ते वाहन चोरीच्या घटना करत असत.
advertisement
...असा लागला सुगावा
आरोपींच्या अटकेनंतर एसपी मनीष खत्री म्हणाले की, शहरात महिलांवरील गुन्ह्यांचा तपास सुरू असताना दोन आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी जेव्हा त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा हे दोन्ही आरोपी वाहन चोरी टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस अधीक्षक विंध्यनगर यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली आणि या टीमने तपास केला असता, संपूर्ण प्रकरण उजेडात आले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींकडून मिळून तब्बल 20 बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.
...अशी करायचे चोरी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दिवसभर बाजारात फिरायचे. यावेळी त्यांना जिथे कुठे नवीन मॉडेलची बाईक दिसली की ते ती चोरण्याचा प्लॅन करायचे. अवघ्या काही वेळातच ते ती गायबही करायचे. चोरी केल्यानंतर आरोपी या बाईक्सची नंबर प्लेट बदलायचे आणि चेसिस नंबरही मिटवून टाकायचे. यानंतर ते स्वतः नवीन बाईक्सवरून फिरायचे आणि जुन्या बाईक्स विकून आपला इतर शौक पूर्ण करायचे.
हे ही वाचा : वाहतूक नियमांची ऐशी-तैशी! ई-रिक्षा झालीय मिनी बस; 22 प्रवाशांनी रस्त्यावर घातला हैदोस
हे ही वाचा : 'या' पोरीला पिस्तूलसोबत Reel बनवणं पडणार महागात; VIDEO झाला व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल