वाहतूक नियमांची ऐशी-तैशी! ई-रिक्षा झालीय मिनी बस; 22 प्रवाशांनी रस्त्यावर घातला हैदोस

Last Updated:

जायमऊ परिसरातील एका ई-रिक्शाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केवळ 5 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या रिक्षामध्ये तब्बल 22 जण गर्दी करून प्रवास करताना दिसत आहेत. यात 16 जण... 

viral video
viral video
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका छोट्याशा ई-रिक्षात तब्बल 22 प्रवासी दाटीवाटीने बसले आहेत. चालक या सगळ्यांचा जीव धोक्यात घालून वेगात ई-रिक्षा चालवत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 'अरे बापरे! ही ई-रिक्षा आहे की मिनी बस?' असं लोक विचारत आहेत. चालक रस्त्यावर बेदरकारपणे रिक्षा चालवताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ते यामागे कोण आहे याचा शोध घेत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील असून तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाला
कानपूरच्या जाजमऊ भागातून नुकताच एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक ई-रिक्षा तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांनी गच्च भरलेली दिसत आहे. हे दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल. नियमानुसार, एका ई-रिक्षात जास्तीत जास्त 5 प्रवासी बसण्याची परवानगी असते, पण या रिक्षात तब्बल 22 लोक होते! यातील 16 जण तर रिक्षाच्या आत दाटीवाटीने बसले होते, तर 6 जण रिक्षाच्या बाहेर अक्षरशः लटकत होते.
advertisement
कानपूरची वाहतूक व्यवस्था चव्हाट्यावर!
ही घटना केवळ वाहतूक नियमांकडे सर्रास होणारे दुर्लक्षच दाखवत नाही, तर कानपूर शहरातील वाहतुकीचा बोजवारा आणि बेशिस्तपणाही चव्हाट्यावर आणते. ई-रिक्षा कानपूरमध्ये वाहतुकीचं एक मुख्य साधन बनली आहे. कमी भाडं आणि सहज उपलब्धतेमुळे ती सामान्य लोकांसाठी पहिली पसंती आहे. तिची लोकप्रियता वाढल्याने ई-रिक्षा चालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. पण आता ती वाहतूक व्यवस्थेचा भाग बनण्याऐवजी मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
advertisement
...म्हणून रिक्षाचालकांची मुजोरी वाढतेय
बऱ्याचदा असे दिसून येते की, जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी ई-रिक्षा चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. याचा थेट परिणाम म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ई-रिक्षाचा तोल जाऊन ती पलटू शकते आणि रोजच लहान-मोठे अपघात घडतात. दुर्दैवाने, काही वेळा हे अपघात इतके गंभीर असतात की त्यात लोकांचा जीवही जातो. असे प्रकार सर्रास घडत असतानाही, या बेदरकार चालकांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, ज्यामुळे त्यांची मुजोरी आणखीनच वाढत चालली आहे.
advertisement
महापालिका लागली कामाला
कानपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने ई-रिक्षांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कठोर उपाययोजना करण्यासाठी अनेकदा घोषणा केल्या आहेत. शहरात ई-रिक्षासाठी विशिष्ट मार्गही निश्चित करण्यात आले आहेत, जेणेकरून मुख्य रस्त्यांवर गर्दी होणार नाही किंवा वाहतूक कोंडी होणार नाही. यासोबतच, ई-रिक्षांवर कर लावण्याची तयारीही सुरू असल्याचे बोलले जाते, जेणेकरून त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. एवढे सगळे प्रयत्न सुरू असतानाही, शहरात मात्र नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे.
advertisement
वाहतूक पोलिसांची भूमिका संशयाच्या घेऱ्यात
या सगळ्या प्रकारात कानपूर शहर वाहतूक पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. शहरातील विविध चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी उघडपणे होणारे हे नियमांचे उल्लंघन पाहूनही सर्रास दुर्लक्ष करतात. यामुळेच ई-रिक्षा चालकांना अशी भावना झाली आहे की, आपल्यावर कोणतीही मोठी किंवा कठोर कारवाई होणार नाही. परिणामी, ते कोणताही धाक न बाळगता प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार करत राहतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
वाहतूक नियमांची ऐशी-तैशी! ई-रिक्षा झालीय मिनी बस; 22 प्रवाशांनी रस्त्यावर घातला हैदोस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement