प्रेमाचा भयंकर शेवट! बळजबरीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; 5 महिन्यांच्या गरोदर तरुणीचा मृत्यू, बाॅयफ्रेंड झाला फरार...

Last Updated:

अंबिकापूरमधील 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू पाच महिन्यांच्या गर्भासह झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की तिच्या प्रियकर गोलू विश्वकर्मा आणि त्याच्या मामाने तिच्यावर जबरदस्ती करून...

pregnant woman death
pregnant woman death
पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या एका तरुणीचा इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकरावर जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबियांचं म्हणणं आहे की, मृत तरुणीचा प्रियकर तिला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथून पळून गेला. त्यानंतर या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये घडली आहे.
कुटुंबियांचा गंभीर आरोप
मायापूर गावात राहणारी 22 वर्षांची तरुणी त्याच परिसरात राहणाऱ्या गोलू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. याच दरम्यान, ती तरुणी पाच महिन्यांची गर्भवती राहिली. सध्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की, गोलू विश्वकर्मा आणि त्याच्या मामा मनोज विश्वकर्मा यांनी मिळून त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. या गोळ्या दिल्यानंतर मुलीची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. त्यानंतर मुलीचा प्रियकर आणि त्याच्या मामाने तिला एका ऑटोमधून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणले. मुलीची गंभीर अवस्था पाहून ते दोघेही तिथून पळून गेले.
advertisement
मुलीच्या कुटुंबाल हवा न्याय 
इथे हॉस्पिटल व्यवस्थापनाने या घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबियांना संपूर्ण प्रकार समजला. आता या प्रकरणात कुटुंबिय न्यायासाठी विनवणी करत आहेत. सध्या पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून आणि पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमाचा भयंकर शेवट! बळजबरीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; 5 महिन्यांच्या गरोदर तरुणीचा मृत्यू, बाॅयफ्रेंड झाला फरार...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement