अशी घडली धक्कादायक घटना
नीलेश रामदास अहिरे (वय-26) आणि त्यांची पत्नी अश्विनी नीलेश अहिरे (वय-19) हे दोघे, जे सध्या चिपळूणच्या पागनाका येथे राहत होते, मूळचे धुळे जिल्ह्यातील साकरी गावचे रहिवासी होते. त्या सकाळी ते दोघे आपल्या मोटारसायकलवरून गांधारेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना, चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांच्यात अचानक वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, त्यांनी रेल्वे स्टेशनकडे न जाता, परत गांधारेश्वर पुलावर येण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पहिल्यांदा बायको उडी घेतली, त्यानंतर पतीने...
पुलावर आल्यावर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात अश्विनीने कोणताही विचार न करता वाशिष्ठी नदीच्या पात्रात उडी घेतली. हे पाहून नीलेशनेही क्षणाचाही विलंब न लावता त्याच ठिकाणी नदीत उडी मारली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना पाहणाऱ्या लोकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत नीलेश आणि अश्विनी दोघेही पाण्यात बुडून दिसेनासे झाले होते. त्यांना वाचवण्याचा कोणालाही प्रयत्न करता आला नाही. तात्काळ या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली.
नुकतंच लग्न झालं होतं आणि...
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. एनडीआरएफच्या पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी गांधारेश्वर मंदिराच्या जवळून वाशिष्ठी नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होते, परंतु दुर्दैवाने दोघांपैकी कोणीही सापडले नव्हते. धुळे जिल्ह्यातील साकरी येथील नीलेश आणि अश्विनी यांचा विवाह अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यात झाला होता. त्यांचे हे टोकाचे पाऊल अनेकांना कोड्यात पाडणारे ठरले आहे.
हे ही वाचा : Barshi News: "तू मला आवडतेस" म्हणत मेहुण्याने हात धरला, केलं लज्जास्पद वर्तन; मेहुणीने दाखवलं धाडस अन् केली तक्रार!
हे ही वाचा : मुलीला गुंगीचे औषध दिलं, नंतर बलात्कार केला, त्याचा व्हिडीओ वडिलांना पाठवला, इतकंच नाहीतर...
