प्रकरण काय?
नवलाख उंब्रे गावामध्ये एका शेतात काही मित्रांनी एक सहज पैज लावली होती. 750 ml देशी दारूची बॉटल एका घोटात संपवायची, असं चॅलेंज रामकुमार साह (35) नावाच्या तरूणाला त्याच्या मित्रांनी दिली. चॅलेंज जिंकण्यासाठी रामकुमारने एका दमात दारू पिण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु त्याला ते चॅलेंज चांगलंच महागात पडले असून त्या तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रमाणाच्या बाहेर दारू पिल्यामुळे राम आजारी पडला. त्याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं सोडून त्याला शेतातच सोडून तिथून पळ काढला. एका दमात बॉटल पिल्यामुळे अचानक त्या तरूणाची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले.
advertisement
पुरावे नष्ट करण्यासाठी काय केले?
जास्त प्रमाणात रामकुमारने दारू प्यायल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचाराची गरज होती. परंतू त्याला ते न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, संशयितांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. रामकुमार साहला बळजबरीने दारू पाजणाऱ्या दोन मित्रांचं नाव, कृष्णा सिंह (35) आणि विकास कुमार असं आहे. कृष्णा आणि विकासविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्थानकांत या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामकुमार, कृष्णा आणि विकास हे तिघंही बिहारचे रहिवासी असून ते पुण्यात तळेगाव एमआयडीसीमध्ये नोकरीला होते. या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन झाल्यानंतर रामचे सर्व मित्र तिथून फरार झाले. बुधवारी (31 डिसेंबर) शेतातून दुर्गंधी येत असल्यामुळे तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी शेताचा पंचनामा केला असता त्यांना राम मृतावस्थेत आढळून आला. बुधवारी रात्री पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी गुरूवारी सकाळी दोन्हीही आरोपींना बेड्या ठोकल्या. भादवि कलम 105 (खून न करता सदोष मनुष्यवधाची शिक्षा), 238 (गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे किंवा गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटी माहिती देणे) आणि 3(5) (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
