एकतर्फी प्रेमातून एका तरुणीच्या कुटुंबावर अॅसिड हल्ला करण्यात आला. खिडकीतून या कुटुंबावर हा अॅसिड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आई, मुलगी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गुवाहाटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
गावातील एक तरुण पुन्हा पुन्हा तरुणीला प्रेमाचा प्रस्ताव देत धमकी देत होता. मंगळवारी रात्री आरोपीने तरुणीच्या कुटुंबावर खिडकीतून अॅसिड फेकत हल्ला केला. खोपानीकुची याठिकाणी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
ती 17 वर्षांची, ड्रग्सची लागली सवय अन् अनेकांशी ठेवले संबंध, 35 जणांचा रिपोर्ट धक्कादायक
एकतर्फी प्रेम अन् तरुणीला धमकी -
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली. आसाममधील हाजो परिसरातील हब्लाखा गावातील एका तरुणाचे खोपानीकुची येथील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला प्रेमाचा प्रस्ताव देऊन धमकीही दिली होती. तरुणाने दिलेल्या धमकीनंतर भीतीने ती तरुणी आपल्या घराऐवजी आपल्या आईसोबत मामाच्या घरात राहत होती.
दरम्यान, मंगळवारी रात्री तिच्यावर, तिच्या आई, भावावर मामाच्या घरात अॅसिड हल्ला केला. कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात आई, मुलगी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
