ती 17 वर्षांची, ड्रग्सची लागली सवय अन् अनेकांशी ठेवले संबंध, 35 जणांचा रिपोर्ट धक्कादायक

Last Updated:

shocking news - एका गरीब कुटुंबातील 17 वर्षांच्या मुलीला बऱ्याच दिवसांपासून अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे समोर आले. अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तिला पैशांची गरज पडत होती, तेव्हा ती तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
तनुज पांडे, प्रतिनिधी
रामनगर : आजही एचआयव्ही एक आजार आहे, ज्यावर उघडपणे भाष्य केले जात नाही. मात्र, याच्याशीच संबंधित एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका एचआयव्ही बाधित किशोरवयीन मुलीमुळे 17 महिन्यांत तब्बल 20 तरुणांना एड्सची लागण झाली आहे. तिला सुस्त वाटू लागल्याने तिने रुग्णालयात तपासणी केली असता ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
advertisement
ही घटना रामनगरच्या गुलरघट्टी परिसरातील आहे. याठिकाणी एचआयव्ही पॉझिटिव्ह तरुणांच्या समुपदेशनादरम्यान एकाच मुलीचे नाव समोर आले आहे. या मुलीने अंमली पदार्थ घेण्याची सवय होती. त्यामुळे ती पैशांची व्यवस्था करण्यासाठी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची.
नैनीताल जिल्ह्यात गेल्या काही वर्षात एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये रामनगर येथील रुग्ण जास्त आहेत. याठिकाणी मागील 17 महिन्यात 45 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. तर एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत 26 नवीन रुग्ण आढळले. तर यानंतर एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत 19 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यामध्ये 30 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. याच 30 पुरुषांमध्ये 20 जण या मुलीमुळे संक्रमित झाले आहेत.
advertisement
रामनगर येथील रामदत्त जोशी संयुक्त रुग्णालयाच्या एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्रात (आयसीटीसी) समुपदेशक मनीषा खुल्बे यांनी बाधित तरुणांची चौकशी केली. यामध्ये रामनगरच्या गुलारघाटी भागातील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील 17 वर्षांच्या मुलीला बऱ्याच दिवसांपासून अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे समोर आले.
advertisement
अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तिला पैशांची गरज पडत होती, तेव्हा ती तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची. या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती नसल्याने तरुणांनी तिच्याकडे वारंवार जाऊन शारीरिक संबंध ठेवले. मात्र, समुपदेशकाने सर्व बाधित तरुणांची चौकशी करून त्याच मुलीचे नाव घेतले. यामध्ये एचआयव्हीचा प्रसार करणारी ती एकच मुलगी असल्याचे समोर आले.
advertisement
15 महिलांनाही लागण -
समुपदेशकाच्या चौकशीनंतर बाधित तरुणांपैकी काही विवाहितही असल्याचे समोर आले. यामध्ये त्यांच्यापासून त्यांच्या पत्नींनाही नंतर एचआयव्हीची लागण झाली. या महिलांचाही समावेश असलेल्या 15 महिलांमध्ये समावेश आहे.
एचआयव्ही आणि एड्समध्ये काय अंतर -
ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) हा एक विषाणू आहे. यामुळे अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) होतो. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणजे एचआयव्ही विषाणूचा संसर्ग होणे आहे. मात्र, बाधित झालेल्या व्यक्तीला एड्स आहे, असे त्याचा अर्थ होत नाही. वेळेत त्याच्यावर उपचार करता येतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये पांढऱ्या रक्तपेशी कमी असतात, तेव्हा एचआयव्हीचे रुपांतर एड्समध्ये होते. यामध्ये आरोग्य विभागातर्फे एचआयव्ही बाधित रुग्णांना मोफत औषधे दिली जातात. तसेच रुग्णाचे नाव आणि पत्ताही गोपनीय ठेवण्यात येते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ती 17 वर्षांची, ड्रग्सची लागली सवय अन् अनेकांशी ठेवले संबंध, 35 जणांचा रिपोर्ट धक्कादायक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement