या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून दिव्या बस्सी आणि प्रिया शर्मा नावाच्या युवतींवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दिलीप लांबोळे असं फसवणूक झालेल्या युवकाचं नाव आहे. शुभमला 28 आणि 29 मे दरम्यान व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिया शर्मा असं नाव सांगणाऱ्या युवतीने मेसेज पाठवून संपर्क केला. त्यानंतर दिव्या बस्सी नावाच्या तरुणीनेही शुभमला वारंवार संपर्क केला.
advertisement
चोरी करायला गेला; पण AC च्या थंड हवेत बसताच चोराला लागली झोप; पोलिसांनी उठवलं अन्...
दोघींनी त्याचा विश्वास संपादन करून त्याला वेगवेगळे टास्क पूर्ण करायला लावले. या टास्कमध्ये जर पैसे गुंतवले तर अधिकचा नफा होईल, असं आमिष त्याला दाखविण्यात आलं. या दरम्यान, युवकाने आपल्या बँकेच्या तीन वेगवेगळ्या अकाऊंटवरुन एकूण 5 लाख 23 हजार रुपयांची रक्कम त्यात भरली. मात्र, त्यात झालेल्या नफ्याची रक्कम शुभमला शेवटी मिळालीच नाही.
5 लाख 23 हजार रुपयांपैकी केवळ 2800 रुपयेच शुभमला मिळाले. संपर्क साधूनही रक्कम मिळत नसल्याने त्याला संशय आला. यानंतर काही वेळानंतर हे अकाऊंट आणि फोन नंबर बंद झाले. शुभमला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
