TRENDING:

एक प्लेट डाळ-भात पडलं 98 हजाराला; जेवण ऑर्डर केलं पण तोंडचं पाणी पळालं, मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?

Last Updated:

80 वर्षीय महिलेला साधी डाळ-भाताची ऑर्डर महागात पडली असून, चुकून आलेली डबल ऑर्डर परत करण्याच्या प्रयत्नात तब्बल 98 हजार 199 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ऑनलाइन खरेदी जितकी सोयीची झाली आहे, तितकीच ती धोकादायकही ठरत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. खार पश्चिमेतील 80 वर्षीय महिलेला साधी डाळ-भाताची ऑर्डर महागात पडली असून, चुकून आलेली डबल ऑर्डर परत करण्याच्या प्रयत्नात तब्बल 98 हजार 199 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
डाळ-भाताच्या ऑर्डरमधून 98 हजारांची ऑनलाईन फसवणूक; खारमधील 80 वर्षीय आजीबाईंची मो
डाळ-भाताच्या ऑर्डरमधून 98 हजारांची ऑनलाईन फसवणूक; खारमधील 80 वर्षीय आजीबाईंची मो
advertisement

नेमके काय घडले?

खार पश्चिम येथे राहणाऱ्या सुरजीत कौर चड्डा (80) यांनी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजता घरबसल्या Zepto या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून डाळ आणि भाताची ऑर्डर दिली. अवघ्या दहा मिनिटांत ऑर्डर त्यांच्या घरी पोहोचली. मात्र, त्यामध्ये दोन डाळ-भात जादा आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अतिरिक्त आलेली वस्तू परत करण्यासाठी त्यांनी गुगलवर जाऊन झेप्टोच्या ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध घेतला. सापडलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने स्वतःला झेप्टोचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.

advertisement

View More

Aajache Rashibhavishya: आर्थिक लाभ होणार, कष्टाचं फळ मिळणार, फक्त टाळा ही चूक, मेष ते मीन आजचं राशीभविष्य

कशी झाली फसवणूक?

फोनवरील व्यक्तीने सुरजीत कौर यांना काही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. तांत्रिक बाबींची माहिती नसल्यामुळे त्यांनी समोरून सांगितलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकूण 98 हजार 199 रुपये परस्पर काढून घेतल्याचे निदर्शनास आले. फसवणूक लक्षात येताच त्यांच्या मुलगा संजीवसिंह चड्डा (59) यांनी तत्काळ तक्रार दाखल केली. या प्रकरणी खार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

ऑनलाइन व्यवहार करताना गुगलवर मिळणारे ग्राहक सेवा क्रमांक अनेकदा बनावट असू शकतात, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोणतीही वैयक्तिक किंवा बँक संबंधित माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, तसेच अधिकृत ॲप किंवा वेबसाइटमधीलच ग्राहक सेवा पर्याय वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की डिजिटल व्यवहार करताना सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अशा व्यवहारांमध्ये कुटुंबीयांची मदत घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
एक प्लेट डाळ-भात पडलं 98 हजाराला; जेवण ऑर्डर केलं पण तोंडचं पाणी पळालं, मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल