17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, पोलिसांना संशय आला, तपासातून बापाचं ‘ते’ कृत्य समोर, सोलापुरात खळबळ
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: बार्शीत शिकणाऱ्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचं संशय वडिलांना होता. परंतु, त्यांचा तो बनाव फसला.
सोलापूर: बाप-लेकीचं नातं विश्वासाचं आणि जिवापाड प्रेमाचं मानलं जातं. परंतु, बार्शी तालुक्यातील रुई येथून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून बापानेच 17 वर्षीय लेकीचा गळा आवळला. विशेष म्हणजे हत्येनंतर आत्महत्येचा बनाव करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरला. वैराग पोलिसांच्या तांत्रिक तपासाने ही ऑनर किलिंगची घटना उघड झाली असून, आरोपी वडिलांना न्यायालयाने 2 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
श्रावणी राजेंद्र नरसुडे (वय 17 वर्षे 3 महिने) ही बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिचे एका तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कुणकुण वडील राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय 54) यांना लागली. रागावलेल्या राजेंद्र यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 च्या सुमारास घरातच श्रावणीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले, मोबाईलमधील चॅट्स डिलीट केल्या आणि धाराशिव रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
दरम्यान, सुरुवातीला वैराग पोलीस ठाण्यात 'अकस्मात मृत्यू'ची नोंद झाली. मात्र, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश पवार यांच्या नेतृत्वात सखोल तपास सुरू झाला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने श्रावणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सायबर तज्ज्ञांनी डिलीट डेटा रिकव्हर करत संशय बळकट केला. पोलिसी खाक्या दाखवताच राजेंद्र याने गुन्हा कबूल केला. हवालदार संदेश पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे वैराग परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, पोलिसांना संशय आला, तपासातून बापाचं ‘ते’ कृत्य समोर, सोलापुरात खळबळ









