पोलिसांनी सांगितले की, 25 एप्रिल रोजी सकाळी पूनम क्षीरसागर या 27 वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत चिरनेर उरण, जंगलात येथे रस्त्याच्या कडेला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 302 (हत्या) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक निजामुद्दीन अली शेख याला अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलीस तपासात मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 18 एप्रिल रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मृत महिला पुनम क्षीरसागर हीचे आणि आरोपी निजामुद्दीन अली शेख सोबत चार वर्ष प्रेम सबंध होते. आरोपी निजामुद्दीन याचे आधीच लग्न झाले होतं आणि त्याला मुलगाही होता त्याचे कुटुंब उत्तर प्रदेश मध्ये राहत होते, तर तो मुंबईतील नागपाडा परिसरात राहत होता. मृत महिला आणि त्यांच्याच याच कारणावरून काही दिवसांपासून खटके उडाले आणि त्यांतून त्याने तिचा ठार मारल्याच्या आपल्या कबुली जबाबात सांगितले. पुढील तपास उरण पोलीस करत आहेत.
वाचा - लग्नानंतर 4 दिवसात भयानक घडलं; बाथरूममधील ड्रममध्ये आढळला नवरीचा मृतदेह
तर दुसरीकडे अलीने पोलिसांकडे असा खुलासा केला की, पूनम धोका देत असल्याचा संशय होता आणि यावरून दोघांमध्ये वादही होत होता. 18 एप्रिलला कामानंतर तिला जेजे हॉस्पिटलजवळ यायला सांगितलं होतं. तिथून कल्याणमध्ये खडावली नदी किनारी तिची गळा आवळून हत्या केली. पूनमचा मृतदेह एका पोत्यात घालून उरणच्या चिरनेर इथं फेकून दिला. टॅक्सी ड्रायव्हर असल्यानं त्या ठिकाणाबद्दल आपल्याला माहिती होती असंही अलीने सांगितलं.
