तक्रारदार तरुणाच्या फिर्यादीवरून, शाहरुख टॉप आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास हा प्रकार घडला. संगम पूल परिसरातील रेल्वे पटरीलगत असलेल्या मोकळ्या जागेत असा प्रकार झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लग्न लागलं अन् 2 तासांत पळाली नवरी, नवरोबाला 5 लाखांना चुना, नेमकं घडलं काय?
advertisement
लुटमारीचे सत्र कायम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत राहणाऱ्या तरुणाची ओळख आरोपींशी एका ‘गे अॅप’वरून झाली होती. आरोपींनी त्याला मंगळवार पेठेतील आरटीओ चौकात भेटायला बोलावले. त्यानुसार तरुण त्या ठिकाणी भेटायला गेला. त्यानंतर संगम पूल परिसरात नेत धमकावून पैशांची मागणी केली. नकार दिल्यावर त्याला मारहाण करत डेबिट कार्ड, मोबाइल आणि दुचाकीची चावी लुटून आरोपी फरार झाले.
2 महिन्यात 6 जणांना लुटले
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत अशाच पद्धतीने पाच ते सहा जणांना लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धायरी भागातील एका व्यावसायिकासह, मगरपट्टा सिटी परिसरातील एका संगणक अभियंत्यासोबतही अशीच घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.