सख्खा भाऊ झाला पक्का वैरी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचं नाव विनोद गणपत तांबे (वय 36) असून, आरोपी रवींद्र तांबे हा त्याचा मोठा भाऊ आहे. शनिवारी मध्यरात्री दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाली. या झटापटीदरम्यान रवींद्रने कुऱ्हाडीने विनोदवर हल्ला करत त्याची जागीच हत्या केली. या दोघांमध्ये कुटुंबातील मालमत्तेवरून वाद सुरू होता. या दोघांमधील वाद शनिवारी मध्यरात्री चांगलाच चिघळला.
advertisement
पोलिसांची तात्काळ कारवाई, फॉरेन्सिक टीम दाखल
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विनोदचा मृतदेह ताब्यात घेऊन दापोली ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी हलवण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र तांबे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट देत पुरावे गोळा केले. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
गावात भीती आणि हळहळचं वातावरण
एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये असा जीवघेणा वाद होऊन खून होण्याची घटना गावकऱ्यांना हादरवून गेली आहे. या संपूर्ण उन्हवरे गावात सध्या भय आणि हळहळीचं वातावरण निर्माण झालं आहे.