TRENDING:

Crime News : लाकडी खुंट्याने बेदम मारहाण, रुग्णालयात न नेता..., नराधम बापाने केलं लेकीसोबत भयंकर

Last Updated:

Sangli Crime news : काही नराधम बापांमुळे लहान वयातच लेकींना आपल्या प्राणाला मुकावे लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका लहानशा कारणातून एका बापाने लेकीचा जीवच घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: बाप आणि लेकीमधील नाते खूपच जवळंच असल्याचे सांगण्यात येते. बाप-लेकीमधील जिव्हाळा हा दृष्ट लागण्यासारखा असतो. मात्र, काही नराधम बापांमुळे लहान वयातच लेकींना आपल्या प्राणाला मुकावे लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका लहानशा कारणातून एका बापाने लेकीचा जीवच घेतला आहे. रात्रीच्या वेळी या आरोपीने पोरीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली होती.
News18
News18
advertisement

मृत मुलीचं नाव साधना धोंडीराम भोसले आहे. साधना ही आटपाडीतील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील धोंडीराम भोसले हे नेलकरंजीतील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. साधना ही बारावीत शिकत होती आणि डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. अलीकडेच NEET च्या चाचणी परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत तिला फार कमी गुण मिळाले. कमी गुण मिळल्याचे समजताच धोंडीराम भोसले यांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जात्याच्या लाकडी खुंट्याने तिला मारहाण होऊ लागली.

advertisement

तुम्ही कुठं कलेक्टर झाला?

वडिलांकडून मारहाण होत असताना दोघांमध्ये शा‍ब्दिक वादही झाले. एवढे शिकून तुम्ही तरी कुठं कलेक्टर झालात, असा उलट सवाल साधनाने तिच्या वडिलांना केला. पोरीच्या उलट बोलण्याने अहंकार दुखावलेल्या बापाने तिला आणखी मारण्यास सुरुवात केली. यात ती गंभीर जखमी झाली.

लेकीला रुग्णालयात दाखल केलं नाही...

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जखमी मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी धोंडीराम भोसले दुसऱ्या दिवशी ‘योग दिन’ साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी परतल्यावर साधना ही बेशुद्ध असल्याचे दिसून आले. ती कोणताच प्रतिसाद देत नसल्याने घाबरलेल्या तिच्या आई-वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रॅक्टर खरेदीवर मिळतंय अनुदान, लगेच करा अर्ज, कोणती लागतील कागदपत्रे?
सर्व पहा

नेलकरंजी गावात आणि आटपाडी तालुक्यात या घटनेने हळहळ आणि संतापाची लाट उसळली असून, समाजाने मुलांवरील शैक्षणिक दडपणाचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : लाकडी खुंट्याने बेदम मारहाण, रुग्णालयात न नेता..., नराधम बापाने केलं लेकीसोबत भयंकर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल