विजापूर येथून संशयित आरोपीच्या घरातून ही रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे विजापूर,सोलापूर आणि उमदी मधील असल्याचं समोर आले आहे. तर ज्या सराफला लुटण्यात आलं होतं, त्या सरफाच्या ड्रायव्हरच्या मुलाला देखील अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त
फिर्याद करणारा सराफ हा कोठे जाणार आहेत, याबाबत लाईव्ह लोकेशन सराफाच्या ड्रायव्हरचा लेक आरोपींना पुरवत होता. सराफाची गाडी विजयपूरकडे जात असताना जत तालुक्यातील मोरबगी या गावाजवळ त्यांची कार अडवून लुटमार केली होती. परंतु, सराफाने तीन लाख रुपयांची चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनी मात्र या प्रकरणात तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
आयकर विभागाला दिली माहिती
विशेष म्हणजे ज्या सराफाला लुटण्यात आलं होतं,त्याने तीन लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल केली होती,मात्र पोलिसांच्या कारवाईमध्ये संशयित आरोपींच्याकडून तब्बल अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे, फिर्यादीची रक्कम आणि पकडण्यात आले रक्कम यामध्ये फार मोठी तफावत असल्याने पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला देखील कळविले आहे.
सहा दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी सापडण्यात आलेल्या रकमेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयीतांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या संशयितांनी इतकी मोठी रक्कम कोठून आणली? फिर्यादी अनिल कोडग यांनी केवळ तीन लाखांची फिर्याद का दिली? तसेच यामध्ये अन्य कोणते संस्थेत सहभागी होते का? याचा देखील शोध आता सांगली पोलिसांना लावायचा आहे.
