TRENDING:

सांगलीत एडक्याने चिरून गुन्हेगाराची हत्या, बंद गोडाऊनमध्ये लपलेल्या चौघांना सिनेस्टाईल बेड्या

Last Updated:

Crime in Sangli: सांगलीच्या वाल्मिकी आवास परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एका टोळीने पाठलाग करून एडक्याने आणि दगडाने मारून गुन्हेगाराचा जीव घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आसिफ मुर्सळ, प्रतिनिधी सांगली: सांगलीच्या वाल्मिकी आवास परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एका टोळीने पाठलाग करून एडक्याने आणि दगडाने मारून गुन्हेगाराचा जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी चौघांना सिनेस्टाईल पद्धतीने बेड्या ठोकल्या आहेत. चारपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. आरोपींनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात सांगितलं आहे. घटनेचा पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.
News18
News18
advertisement

वाल्मिकी आवास येथे भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे (वय २०) याचा निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अवघ्या १२ तासात जेरबंद केले. इतर दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण महादेव गायकवाड (वय २० रा. राजीव गांधी नगर, सांगली) आणि युवराज हणमंत कांबळे (वय १९ रा. टिबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली.

advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत सौरभ कांबळे हा वाल्मिकी आवास योजना परिसरात राहतो. त्याच्यावर मारामारीसह दोन गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे. संशयित आणि सौरभ यांच्यात आठ दिवसापूर्वी वादावादी झाली होती. त्याच वादाचा राग मनात धरून शनिवारी संशयितांना सौरभची वाल्मिकी आवास परिसरात हत्या केली. यावेळी सर्व आरोपी शेतातून या आवास परिसरात शिरले होते.

advertisement

आवास परिसरात शिरल्यानंतर आरोपींनी सौरभशी वादावादी केली. त्यानंतर बिल्डिंग क्रमांक सात येथे त्याला नेले. त्याठिकाणी एडका आणि दगडाने डोक्यात, मानेवर आणि हातावर मारहाण केली. एडक्याचा वार गळ्यावर वर्मी बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात सौरभ खाली पडला होता. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात सौरभला पडल्याचे पाहून हल्लेखोर तेथून पसार झाले.

खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपाधीक्षक विमला एम., सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. पसार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पथके तत्काळ रवाना करण्यात आली. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की, या खुनातील गायकवाड टोळी ही टिबर एरिया येथील बंद गोडाऊनच्या आत लपून बसली आहे. मिळालेल्या माहितूनुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकत चौघांना ताब्यात घेतले. यातील दोघे अल्पवयीन आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
सांगलीत एडक्याने चिरून गुन्हेगाराची हत्या, बंद गोडाऊनमध्ये लपलेल्या चौघांना सिनेस्टाईल बेड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल