संग्रामचा संशयास्पद मृत्यू
संग्राम राजाराम वाघ असे या तरुणाचे नाव असून तो 25 वर्षांचा आहे. आरवडे (ता. तासगाव) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संग्रामचा चुलत भाऊ आशिष उत्तम पाटील (रा. वाघापूर) यांना सोमवारी सकाळी (दि. 25) संग्राम आपल्या खोलीत पालथा झोपल्याचे दिसून आले. त्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आशिष आणि संग्रामची आई यांनी संग्रामला उताणे केले असता, त्याच्या उजव्या भुवईवर जखम असल्याचे आणि गळ्यावर फास लावल्याचे व्रण असल्याचे दिसून आले.
advertisement
खून झाल्याचा पोलिसांचा संशय
संग्रामची परिस्थिती पाहून तातडीने डाॅक्टरांना बोलावून घेतले, तेव्हा डाॅक्टरांनी मृत असल्याचे सांगितले. तासगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली असता ते तातडीने दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी त्याच्या उजव्या भुवईवर जखम आणि गळ्याभोवती व्रण असल्याचे सांगितले. पण व्हिसेरा राखून ठेवला आहे. प्रथमदर्शनी संग्रामचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : सावधान! WhatsAppमधील 'या' लिंक्स चुकूनही करू नका क्लिक; अन्यथा बँक खातं होईल रिकामं, कशी घ्याल काळजी?
हे ही वाचा : आशीर्वाद घेणं पडलं महागात! घाटात थांबवलं अन् साधूंनीच लुटलं; महिलांचे दागिने घेऊन 'ही' टोळी झाली फरार, पण...