छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ येथे एका 28 वर्षीय तरुणाला अज्ञातांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे मयत तरुण हा अर्ध नग्न अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अर्जुन रतन प्रधान वय 28 मृत तरुणाचं नाव आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह एकलहेरा रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याला कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून बेदम मारहाण करत त्याचा निर्घृण खून केला असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
एका २८ वर्षीय तरुणाची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कुणी केली? कशासाठी केली? याची कसलीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलीस सर्व बाजुने तपास करत आहेत. मयत तरुणाचं कुणासोबत पूर्व वैमनस्य होतं का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
