TRENDING:

16 वर्षांच्या मुलीसह मैत्रिणीला घरात डांबलं, प्रफुल्ल लोढाचा दोघींवर अत्याचार, अश्लील VIDEO बनवले

Last Updated:

Crime in Jalgaon: नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना आता हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव ब्रेक, विजय वाघमारे: नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना आता हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचली आहेत. हनीट्रॅप प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत पोस्को बलात्कारसह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून प्रफुल लोढा यास अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा यास अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव जामनेर व पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेची पोलिसांकडून झडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त केली आहेत.
News18
News18
advertisement

जळगावच्या जामनेरमधील रहिवासी असणाऱ्या प्रफुल्ल लोढावर अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोस्को, बलात्कार आणि हनीट्रॅपचा गुन्हा दाखल झाला आहे . यापूर्वी प्रफुल्ल लोढा याच्यावर साकीनाका पोलीस स्टेशन मध्येही पोस्कोसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी साकीनाका पोलिसांकडून प्रफुल्ल लोढा याला 5 जुलै रोजी चकाला येथील लोढा हाऊसवरून अटक केली होती.

साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीवर आणि तिच्या मैत्रीणीवर अत्याचार केल्याचा आरोप आरोपी. आरोपी लोढा याने दोन्ही मुलींवर अत्याचार करून त्याचे अश्लील छायाचित्र काढल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर मुलींना लोढा हाऊसमध्ये डांबून ठेवत त्यांना धमकवल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे.

advertisement

आता अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर पोस्कोसह बलात्कार आणि हनी ट्रॅपच्या कलमांतर्ग गुन्हा दाखल केला आहे. प्रफुल्ल लोढा यास अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव जामनेर आणि पहूर या ठिकाणी त्याच्या मालमत्तेची पोलिसांकडून झडती घेण्यात आली. तपासणी दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक डिवाइस जप्त केले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

प्रफुल्ल लोढा हा एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. पण नंतर प्रफुल्ल लोढाने त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या पाच दिवसात लोढाकडून माघार घेण्यात आली होती. कथित समाजसेवक आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. तर नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेल्या 72 अधिकाऱ्यांमध्ये जळगावमधील माजी एक लोकप्रतिनिधीसह दोन अधिकारी अडकल्याची माहिती, यातही लोढाचा काही सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
16 वर्षांच्या मुलीसह मैत्रिणीला घरात डांबलं, प्रफुल्ल लोढाचा दोघींवर अत्याचार, अश्लील VIDEO बनवले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल