समोर आलेल्या माहितीनुसार, जकप्पा पुजारी यांचे कर्नाटकातील विजयपूर येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या प्रकाराला सविता पुजारी सातत्याने विरोध करत होती. त्यामुळे पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते.
मंगळवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये तीव्र भांडण झाले. आपल्या विवाहबाह्य संबंधांना विरोध का करते असा सवाल जकप्पाने केला. भांडण जास्त वाढल्यानंतर रागाच्या भरात जकप्पा पुजार्याने कोयता उचलत सविता यांच्या डोक्यावर व गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सविता घटनास्थळी कोसळून मृत्यूमुखी पडली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी जकप्पा पुजार्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वडापूर परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली असून, या निर्घृण हत्येबद्दल लोकांत संताप व्यक्त केला जात आहे.
