विशेष म्हणजे मारहाण करणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे निकटवर्तीय आहेत. चार आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य एक जण फरार आहे.
बीडवरुन अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन एका महिलेशी वाद झाला.यानंतर ही बस अंबाजोगाई शहरात पोहचताच चारजणांनी बसमध्ये घुसत विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वाहक व चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे न ऐकता या चौघांनी या दोघांना खाली उतरवत मारहाण सुरुच ठेवली. या मारहाणीत संदेश सावंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एसआरटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
advertisement
दरम्यान त्याचा मित्र राहुल केंद्रे याच्या फिर्यादीवरुन अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात ऋषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे, बालाजी जगदाळे या चौघांविरोधात कलम 109,104(1),115(2),352, 351(2),351(3),3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान उपचार घेतल्यानंतर संदेश सावंत याने आपल्याला अंबाजोगाई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात जबर मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर एक आरोपी फरार आहे.
