तलवार फिरवत होता हवेत
एमआयटी महाविद्यालयात प्रशांत हातात नंगी तलवार घेऊन हवेत फिरवत होता. ही गंभीर बाब साताऱ्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या लक्षात आली. त्यानंतर फौजदार गोविंद एकीलेवाले यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच प्रशांत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडले.
‘क्रेझ’च्या नादात तलवार नाचवली
advertisement
प्रशांतने बी.एस.सी. मध्ये प्रवेश घेतला आहे, पण त्याला शिक्षण सोडून सोशल मीडियावर 'क्रेझ' दाखवण्याचा नाद लागला आहे. त्याचे वडील चालक असून, आई गृहिणी आहे. त्याने अजमेरहून तीन हजार रुपयांत तलवार विकत आणली होती. 'युवा मंच' नावाचे स्वतःच्या नावाची संघटना स्थापन करून तो सोशल मीडियावर तलवारीसोबतचे व्हिडिओ पोस्ट करत असे. नुकतीच त्याने चारचाकीवर बसून 'मार्केटमध्ये क्रेझ पाहिजे' असे गाणे वाजवत शहरात मिरवणूक काढली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळून त्याला ‘जमिनीवर’ आणले आहे.
हे ही वाचा : Satara News : दुचाकीवरून आले अन् धाड धाड धाड बेछूट गोळीबार, साताऱ्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO