Satara News : दुचाकीवरून आले अन् धाड धाड धाड बेछूट गोळीबार, साताऱ्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आी आहे. साताऱ्याच्या शिवरळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याची माहिती आहे.
Satara News : साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आी आहे. साताऱ्याच्या शिवरळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेत रियाज उर्फ मन्या इकबाल शेख हा जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने शिरवळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत रियाज उर्फ मन्या रस्त्यावर उभं राहून एका व्यक्तीशी बोलत होते. या दरम्यानच रस्त्यावरून एक दुचाकी त्यांच्यासमोर आली. या दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने बंदुक काढून रियाज यांच्यावर रोखली होती. त्यानंतर हल्लेखोराने बंदुकीतून रियाजवर हल्ला करायला सूरूवात केली होती.
advertisement
हा हल्ला पाहून रियाज यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान आरोपी हल्लेखोराने देखील त्याचा पाठलाग करत त्यांना गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रियाज आपल्यापासून खूपच दुर गेल्याचे पाहून आरोपीने दुचाकीवरून पळ काढला होता. खरं तर दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
या हल्ल्यात रियाज उर्फ मन्या इकबाल शेख जखमी झाला आहे.जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता शिरवळ पोलीस हल्लेखोरांच्या शोध घेत आहेत. या घटनेने साताऱ्यात खळबळ माजली आहे.
advertisement
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
साताऱ्यात एका 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तिला कारमधून एका लॉजवर नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने हे कृत्य केले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणावर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
advertisement
पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिला खटाव तालुक्यातील एका गावात 2023 मध्ये, ती आठवी इयत्तेत शिकत असल्यापासून सतत त्रास देत होता. "तू माझ्याशी बोल, नाहीतर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकीन," अशी धमकी तो सतत देत होता. 2 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी आरोपीने तिला फोन करून सातारा शहरातील एका चौकात बोलावले. त्यावेळी त्याच्या चारचाकी गाडीमध्ये त्याचे दोन मित्रही होते. आरोपीने तिला गाडीत बसण्यास सांगितले आणि ती बसली.
advertisement
गाडी पोवई नाका परिसरात नेण्यात आली. तेथे एका लॉजजवळ गाडी थांबवून, पार्किंगमध्ये आरोपीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर तिला लॉजमध्ये नेऊन तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने घाबरून न जाता थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
September 16, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara News : दुचाकीवरून आले अन् धाड धाड धाड बेछूट गोळीबार, साताऱ्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO